दूध, चीज पेक्षा जास्त या एकाच गोष्टीत, नाव माहीत आहे का ?

| Updated on: Nov 08, 2024 | 9:30 PM

तीळाच्या पोषक तत्वामुळे हे दूध आणि चीज पेक्षा अधिक फायदेशीर ठरते आपल्या आहारात तिळाचा समावेश केल्याने फक्त कॅल्शियमच मिळत नाही तर इतर अनेक आरोग्यदायी फायदे देखील मिळतात.

दूध, चीज पेक्षा जास्त या एकाच गोष्टीत, नाव माहीत आहे का ?
तीळाचे फायदे
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
Follow us on

शरीराला कॅल्शियमचे नितांत गरज लहान मुलांपासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत सर्वांनाच कॅल्शियमची आवश्यकता असते. भारतामध्ये कॅल्शियमचे मुख्य स्त्रोत म्हणजे दूध आणि चीज असे समजले जाते. शरीराला ताकद देण्यासाठी आणि हाडे मजबूत करण्यासाठी दूध आणि चीज खूप महत्त्वाचे मानले जाते.

एक अशी गोष्ट आहे जी दूध आणि चीज पेक्षा जास्त फायदेशीर आणि कॅल्शियम ने समृद्ध आहे. ती एक गोष्ट म्हणजे तीळ. तीळच्या पोषक तत्वामुळे हे दूध आणि चीज पेक्षा अधिक फायदेशीर ठरते आपल्या आहारात तिळाचा समावेश केल्याने फक्त कॅल्शियमच मिळत नाही तर इतर अनेक आरोग्यदायी फायदे देखील मिळतात. त्यामुळे पुढच्या वेळी तुम्हाला कॅल्शियमची कमतरता जाणवली तर दूध आणि चीज सोबत तीळ खायला अजिबात विसरू नका.

तीळामध्ये असलेले पोषक तत्व

तिळामध्ये अनेक महत्त्वाचे पोषण तत्व असतात ज्याच्यामध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असतं. 100 ग्राम तिळामध्ये 975 मिलीग्राम कॅल्शियम असते जे दूध आणि पनीरच्या तुलनेत अधिक प्रमाणात आहे. तिळामध्ये प्रोटीन, फायबर, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि आयर्न हे देखील असते.

तीळ खाण्याचे फायदे

हाडे मजबूत होतात

कॅल्शियम तिळामध्ये मुबलक प्रमाणात असते. जे हाडे मजबूत करण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे हे ऑस्टियोपोरोसिस सारख्या आजारांना दूर ठेवण्यात देखील मदत करते.

हृदयाचे आरोग्य सुधारते

तिळामध्ये असलेले सेसमिन नावाचे संयुग हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते हे कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवते आणि हृदयविकार टाळते.

पचनक्रिया सुधारते

तिळामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे पचनक्रिया सुधारते त्यामुळे बद्धकोष्ठता आणि ज्याच्या समस्येपासून आराम मिळतो.

त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर

तिळाचे तेल त्वचा आणि केसांसाठी वरदान मानले जाते. हे त्वचा मऊ आणि चमकदार बनवते तसेच केस मजबूत आणि घट्ट करते.

तिळाचे सेवन कसे करावे ?

तीळ अनेक प्रकारे खाता येते तीळ कच्चे, भाजलेले किंवा तेलाच्या स्वरूपात खाऊ शकतात तिळाचे लाडू चटणी तिळाची पोळी आणि कोशिंबीर मध्ये देखील तिळाचा वापर केला जाऊ शकतो.