सहसा, प्रत्येक पालक (Every parent) मुलाच्या जन्मापासून ते मुलं मोठे होईपर्यंत प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टीची काळजी घेतात. आपल्या पाल्याला चांगले पोषण आणि विकास मिळावा यासाठी पालक प्रयत्न करतात आणि त्यासाठी ते सर्व प्रकारचे प्रयत्न करत असतात. पण संगोपन करताना पालक अशा काही चुका करतात, जे काही वेळा त्यांच्यासाठी नंतर पश्चाताप (Repentance) करण्यासारखे ठरू शकतात. जेव्हा मूल 2 वर्षांचे होते, तेव्हा ते पालकांच्या प्रत्येक क्रिया लक्षात घेतो आणि त्यांची कॉपी करू लागतो. आई-वडिलांनी काही चूक केली तर त्यालाही तीच वाईट सवय लागू शकते. बाहेरच्या व्यक्तीसमोर मुलाने या सवयी दाखविल्यावर परिस्थिती बिघडते आणि पालकांना लाज वाटावी (Shame on you) अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. तज्ज्ञांच्या मते, पालकांनी अशा सवयी मुलांसमोर अंगिकारताना काळजी घ्यायला हवी.
आपल्या आयुष्यात चढ-उतार येत असतात. काही घटना चांगले असतात तर, काही वाईटही असतात. या सगळ्यात आपण मोठी माणसं कधी कधी अशी वागणूक अंगीकारतो, ज्यामुळे आपल्यातील वाईट माणूस बाहेर येतो. आई-वडिलांमध्ये वाद झाला तर मुलासमोर एकमेकांवर ओरडण्याची चूक त्यांनी करू नये. कारणं मुलांना हे तुमचे वागणे चूकीचे आहे याची समज नसते. त्यामुळे तो कधीकधी इतरांवर त्याच प्रकारे ओरडतो आणि तेच शब्द वापरतो, जे तुम्ही रागाच्या भरात तोंडातून काढले होते. हे शब्द अपशब्द देखील असू शकतात, ज्यामुळे तुम्हाला इतरांसमोर लाज वाटू शकते.
अनेक वेळा पालक त्यांच्या 2 वर्षाच्या किंवा त्याहून अधिक वयाच्या मुलासमोर किस करतात. हा जीवनाचा एक भाग आहे, परंतु मुलासमोर हे करणे कुठेतरी चूक असल्याचे सिद्ध होऊ शकते. तुमचे मूल तुमची ही चूक इतरांसमोर पुन्हा करू शकते त्यामुळे तुम्हाला त्या कृतीची लाज वाटेल.
काही पालक असे असतात ज्यांना रागाच्या भरात वस्तू फेकून देण्याची सवय असते. तुमची ही सवय तुम्हालाच नाही तर तुमच्या मुलाचेही नुकसान करू शकते. अशी वृत्ती कधीही अंगीकारू नका आणि मुलासमोर ही चूक करण्याची चूक करू नका. तुम्हाला पाहून तुमचे मूल सामान्य परिस्थितीतही महागड्या वस्तू फेकून देऊ शकते. ज्यामुळे तुमचे भारी नुकसानही होऊ शकते किंवा मुलांना दुखापतही होऊ शकते.