मुंबई | 13 जानेवारी 2024 : आजच्या धकाधकीच्या जीवनात महिलांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. बदलत्या जीवनशैलीमुळे महिलांचं महिन्याचं सायकल पूर्णपणे बदलतं… अशात मासिक पाळी दरम्यान अनेक समस्या जाणवतात. मासिक पाळीच्या वेळी अनेक महिलांना क्रॅम्प, मूड स्विंग, पोटदुखी इत्यादींचा त्रास होतो. तर काही महिलांना मासिक पाळीदरम्यान पिंपल्स येतात. होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे आणि फास्टफूडमुळे देखील मासिक पाळीवर फरक पडतो. सांगायचं झालं तर, मासिक पाळी सुरू होण्याच्या 7 ते 10 दिवस आधी चेहऱ्यावर पिंपल्स येऊ लागतात आणि मासिक पाळी सुरू होताच आपोआप जातात…
मासिक पाळी दरम्यान, शरीरातील इस्ट्रोजेनची पातळी कमी होते आणि टेस्टोस्टेरॉन हार्मोनची पातळी वाढू लागते, ज्यामुळे त्वचेच्या छिद्रांमध्ये सेबम तयार होण्यास सुरुवात होते आणि त्वचा तेलकट होते आणि चेहऱ्यावर पिंपल्स येतात. सांगायचं झालं तर, मासिक पाळी येण्याआधी चेहऱ्यावर पिंपल्स येतात.
पिंपल्स येत असल्यास, दिवसातून दोन ते तीन वेळा फेसवॉशने चेहरा स्वच्छ करा. चेहऱ्यावरील बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी चहाच्या झाडाचे तेल वापरू शकता. मासिक पाळी दरम्यान कॉस्मेटिक, सनस्क्रीन आणि इतर सौंदर्य प्रसाधनांचा वापर करणं टाळा…
हेलमेट, कॉलर, स्कार्फ इत्यांदी गोष्टींमुळे पिंपल्स फुटू शकतात. म्हणून चेहऱ्यावर पिंपल्स असल्यास चेहऱ्यावर घाम येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. मासिक पाळी दरम्यान साखर, मैदा किंवा इतर प्रोसेस्ड फूड खाऊ नका. एवढंच नाही तर, मासिक पाळी दरम्यान अधिक त्रास होत असेल तर, डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या…
महिलांमध्ये इररेग्यूलर मासिक पाळीमध्ये मोठ्या प्रमाणात. अनेक महिलांना प्रत्येक महिन्यात मासिक पाळी येत नाही. थायरॉईड, पीसीओडी, पीसीओएस… यांसारख्या समस्यांमुळे महिलांना मासिक पाळी येण्यास अनेक अडथळे येतात. सध्या घडीला अनेक महिला या समस्यांचा सामना करत आहेत…