कबुतरांमुळे वाढतोय गंभीर आजार, वेळीच सावध व्हा आणि बाल्कनीत येण्यापासून असे रोखा

| Updated on: Jul 23, 2024 | 9:20 PM

कबुतर तसे तर कोणाला आवडत नाहीत. पण त्यांच्यामुळे गंभीर आजार होऊ शकतात. कबुतर आपल्या घराच्या बाल्कनीत येत असतात. पण त्यांना आपल्या घराच्या बाल्कनीत येण्यापासून रोखण्यासाठी तुम्ही काही उपाय करु शकतात. कोणते आहेत ते उपाय जाणून घ्या.

कबुतरांमुळे वाढतोय गंभीर आजार, वेळीच सावध व्हा आणि बाल्कनीत येण्यापासून असे रोखा
Follow us on

कबुतर हे फार कमी लोकांना आवडतात. अनेकदा ते आपल्या बाल्कनीत येतात. पण जर त्यांचं घराजवळ येण्याचं प्रमाण जास्त असेल तर तुम्ही वेळीच सावध व्हा. कारण तुम्ही विचार पण केला नसेल इतका गंभीर आजार तुम्हाला त्यांच्यामुळे होऊ शकतो. दिल्लीतील एका मुलामध्ये अतिसंवेदनशीलता न्यूमोनिटिस या दुर्मिळ फुफ्फुसाच्या आजाराची लक्षणे आढळून आली आहेत. याला एक प्रकारचा न्यूमोनिया देखील म्हणतात, जो अत्यंत घातक असतो. त्यामुळे तुम्ही वेळीच यावर उपाययोजना केल्या पाहिजेत.

हा आजार कबुतराची विष्ठा आणि पिसांच्या बऱ्याचदा संपर्कात आल्यामुळे होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला जर या जीवघेण्या आजारापासून बचाव करायचा असेल तर तुम्ही सतर्क राहण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही तुम्हाला काही उपाय योजना सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही त्यांना घरापासून लांब ठेवू शकतात.

मिरची स्प्रे

कबुतरांना जर तुम्हाला तुमच्या बाल्कनीपासून दूर ठेवायचे असेल तर तुम्ही लाल मिरचीचा स्प्रे वापरु शकतो. तुम्ही दोन्ही मिरची पावडर पाण्यात वेगवेगळे मिसळून फवारणी करू शकता. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही काळी आणि लाल तिखट मिसळूनही पेस्ट बनवू शकता. या पद्धतींनी कबूतर तुमच्या बाल्कनीत येणार नाहीत.

व्हिनेगर आणि बेकिंग सोडा

जर तुमच्या बाल्कनीत पुन्हा पुन्हा कबुतर येत असतील ते चांगले नाही. यासाठी तुम्हालसा व्हिनेगर उपयुक्त ठरेल. यासाठी एका भांड्यात 2 चमचे व्हिनेगर आणि बेकिंग सोडा मिसळून द्रावण तयार करा. आता एका स्प्रे बाटलीत भरून बाल्कनीत फवारणी करा. कबूतर त्याच्या वासाने पळून जातील आणि परत येणार नाहीत.

वाइन आणि दालचिनी

कबुतर बाल्कनीत येऊन खूप घाण करतात. जे आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही. त्यामुळे तुम्हाला त्यांना घराच्या बाल्कनीत येण्यापासून रोखायचे असेल तर तुम्ही वाइन आणि दालचिनी यांचा एकत्र वापर करु शकता. एका भांड्यात पाणी, वाइन आणि दालचिनी पावडर मिसळा आणि शेक करा. आणि दिवसाच्या सुरुवातीला त्याची फवारणी करा. जेथे कबुतर येतात त्याठिकाणी अधिक फवारणी करा.

डिंक किंवा मध

बाल्कनी आणि खिडकीवर घाण पसरवणाऱ्या कबुतरांना चिकट जागेवर बसायला आवडत नाही. त्यामुळे तुम्ही त्यांना घरापासून दूर ठेवण्यासाठी डिंकाचा वापर करु शकता. बाल्कनीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी डिंक पसरवू शकता किंवा त्याऐवजी तुम्ही मध देखील वापरू शकता. या पद्धती वापरून, कबूतर तुमच्या बाल्कनीत दिसणार नाहीत.