मुंबई : प्रदुषणाच्या दुष्परिणाम सर्वांवर होतात मात्र त्याचा सर्वात जास्त धोका वाढत्या वयात असतो. कारण वाढत्या वयात प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे वाढत्या वयात प्रदुषणापासून लांब राहणे खूप गरजेचे असते. या काही गोष्टींचं पालन करून तुम्ही प्रदुषणाच्या दुष्परिणामांना टाळू शकता. अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात हवेतील प्रदुषण वाढलं आहे.
धुम्रपान करणं टाळा
अनेकांना धुम्रपानाची सवय असते. त्यामुळे श्वसनाचे आजार, कॅन्सर सारखे गंभीर धोके उद्भवतात. वाढत्या वयात अनेकांचं एकटेपण वाढतं. त्यामुळे उतारवयात अनेकांना धुम्रपानाच्या सवयी लागतात. त्याचा गंभीर परिणाम तब्येतीवर होऊ शकतो. अशा वेळी घरातील ज्येष्ठांना धुम्रपानापासून दूर ठेवण्यात तरुणाईचाही सहभाग महत्वाचा आहे. त्यांना धुम्रपानाचे दुष्परिणाम समजवून सांगा आणि त्यांना धुम्रपानापासून दूर ठेवा.
श्वसनाचे व्यायाम करा
वाढत्या वयात श्वसनाचे व्यायाम करणे अत्यंत गरजेचे असते. श्वसनांच्या व्यायामुळे तुम्हाला जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळतो. घरातच योगा, प्रणायम अशा गोष्टी नियमीत केल्यास तुमचं आरोग्य उत्तम राहू शकतं. घरात एअर प्युअरीफायर लावणे हाही प्रदुषणापासून वाचण्यासाठी उत्तम उपाय आहे. एअर प्युरीफायर लावल्यानं घरातील प्रदुषित हवा बाहेर पडून हवेची गुणवत्ता सुधारु शकते.
घरातील कुंड्यांमध्ये रोपटी लावा
ज्या परिसरात झाडांची संख्या कमी असते त्या परिसरात प्रदुषण जास्त असते. झाडांमुळे झाडांमुळे जास्तीत जास्त ऑक्सिजन तयार होतो. त्यामुळे जास्तीत घराच्या परिसरात जास्तीत जास्त झाडं लावा. ही झाडं तुम्हाला प्रदुषापासून वाचवतील. घराच्या खिडकीत कुंंड्या ठेवा आणि त्यात जास्तीत जास्त रोपटी लावा. त्यामुळे चांगली हवा मिळण्यास मदत होते.