मुंबई: जेव्हा जेव्हा आपण घराबाहेर पडतो तेव्हा धूळ, माती, प्रदूषणाचा सर्वप्रथम आपल्या त्वचेवर परिणाम होतो. मात्र खराब जीवनशैली आणि खराब ब्युटी प्रॉडक्ट्सच्या वापरामुळे आपल्या त्वचेवर पिंपल्स, डाग पडू लागतात आणि आपण चेहऱ्याची चमक गमावून बसतो. अशावेळी चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी लोक पार्लरमध्ये जातात. पण असे करूनही त्यांना नैसर्गिक सौंदर्य प्राप्त होत नाही.
आज आम्ही तुम्हाला चमकदार त्वचा मिळवण्यासाठी एक खास घरगुती उपाय सांगणार आहोत. जेवणात सर्वात जास्त वापरला जाणारा बटाटा देखील आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. होय, बटाटा त्वचेला खोलवर स्वच्छ करतो आणि चेहऱ्यावरील घाण, मृत त्वचा आणि अतिरिक्त तेल काढून टाकतो. बटाट्यामध्ये अँटी-एजिंग गुणधर्म आढळतात. ज्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि बारीक रेषाही दूर होतात. चेहऱ्यावरील डाग, पिग्मेंटेशन आणि टॅनिंगची समस्याही बटाट्यामुळे दूर होते. चला तर मग जाणून घेऊया चमकदार त्वचेसाठी बटाट्याचा वापर कसा करू शकता.
बटाट्याच्या या फेसपॅकमध्ये तुम्ही सर्वप्रथम कच्चे बटाटे बारीक करून पेस्ट तयार करा. नंतर त्यात दोन चमचे दही घालावे. चिमूटभर हळद घालून मिक्स करा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर 10 ते 15 मिनिटे लावा. यानंतर नॉर्मल पाण्याने चेहरा धुवून घ्यावा. आठवड्यातून दोनदा हा उपाय करा. यामुळे तुम्हाला चमकदार आणि निर्दोष त्वचा मिळेल.
एका बाऊलमध्ये दोन चमचे कोरफड जेल घ्या. आता त्यात दोन चमचे कच्च्या बटाट्याचा रस घाला. नंतर ते मिक्स करून चेहऱ्यावर 15 मिनिटे लावावे. कोरडे झाल्यावर चेहरा पाण्याने धुवावा. अशा प्रकारे तुम्ही आठवड्यातून तीन वेळा ही पेस्ट लावू शकता. यामुळे तुमची त्वचा मुलायम आणि चमकदार होईल.
टोमॅटो आणि बटाटे वापरा. यासाठी एका बाऊलमध्ये एक चमचा बटाट्याचा रस आणि एक चमचा टोमॅटोचा रस मिसळावा. नंतर त्यात दोन चमचे मध घाला. आता ते नीट मिक्स करा. हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटे राहू द्या. आता चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. हा फेसपॅक लावल्याने चेहऱ्यावरील मुरुम आणि डाग दूर होतात.