मुंबई : बटाटे ही एक भाजी अशी आहे जी बाजारात 12 महिनेही विकली जाते आणि बाजारात मिळते. लहान मुलापासून ते मोठ्यापर्यंत बटाटा सर्वांनाच आवडतात. बटाटाचा वापर बहुतेक सर्व भाज्यांमध्ये होतो. यासह, फ्रेंच फ्राईज, बटाटा टिक्की, बर्गर, वडा पाव यासारखे सर्व प्रकारचे स्नॅक्सही बटाटापासून बनवले जातात. तसेच बटाटा आपल्या त्वचेसाठी देखील खूप जास्त उपयुक्त आहे. (Potato juice is beneficial for hair)
बटाटाचा चेहऱ्यासाठी मास्क देखील तयार केला जाते. यामुळे त्वचा सुंदर, मुलायम, चेहऱ्यावरील डाग, पिपल्स आणि चेहरा ग्लो देखील होतो. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? की, त्वचेसाठी नाहीतर बटाट्याचा रस आपल्या केसांसाठी देखील खूप फायदेशीर आहे. बटाटा किसून घ्या आणि त्याचा रस एक वाटीमध्ये काढा. यामध्ये फेटलेले अंडे आणि एक मोठा चमचा मध मिक्स करा.
हे मिश्रण आपल्या केसांना 30 मिनिटांसाठी लावून ठेवा. यानंतर थंड पाण्याने केस स्वच्छ धुऊन घ्या. बटाट्याच्या रसाप्रमाणे कांद्याचा रस देखील केसांच्या वाढीसाठी पोषक मानला जातो.
सामग्री- एक मोठा बटाटा, एक मध्यम आकाराचा कांदा हेअर पॅक तयार करण्याची पद्धत अगदी सोप्पी आहे. बटाटा व कांदा सोलून घ्या आणि छोट्या-छोट्या आकारात कापा. यानंतर बटाटा आणि कांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून त्याची पेस्ट तयार करा. याचा रस एका बाउलमध्ये गाळून घ्या. या रसाने आपल्या टाळूचा मसाज करावा.
संबंधित बातम्या :
Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!
पायांना सतत दुर्गंध येतोय? मग ‘या’ घरगुती टिप्स ट्राय करा नि समस्येतून मुक्त व्हा!
Eczema Myth | ‘एक्झिमा’ आजाराबद्दल लोकांमध्ये संभ्रमाची स्थिती, जाणून घ्या या मागचं पूर्ण सत्य…#eczema | #Health | #skincare | #skincareproducts https://t.co/azKyegZj0a
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 26, 2021
(Potato juice is beneficial for hair)