मुंबई : गरोदरपणात संतुलित आहार घेणे खूप महत्वाचे आहे. कारण आईने संतुलित आहार घेतला तर मूल निरोगी राहते. या काळात बर्याच पौष्टिक गोष्टी गर्भवती महिलेच्या आहारात समाविष्ट कराव्यात असे सांगितले जाते. त्यामध्ये मशरूममध्ये अनेक पोषक तत्व आहेत. पण मशरूम खाण्याचे काही फायदे आणि तोटे देखील आहेत. मात्र, गरोदरपणात मशरूम खाणे आरोग्यासाठी चांगले आहे की, नाही हे आज आपण बघणार आहोत. (Pregnant women should follow this things while eating mushrooms)
गरोदरपणात महिलांनी मशरूम खाल्ये तरी काही हरकत नाही. मात्र, गरोदरपणात महिलांनी मशरूम खातांना विशेष काळजी घेण्याची आवश्यक्ता असते. गरोदरपणात मशरूम पुर्णपणे शिजवूनच खाल्ले पाहिजे. बाळासाठी मशरूम हे खूप चांगले असते. मशरूममध्ये पोटॅशियम, प्रथिने, तांबे, सेलेनियम, फॉस्फरस, अँटिऑक्सिडंट्स, फायटोकेमिकल्स, जीवनसत्त्वे सी, बी आणि डी सारख्ये बरेच पौष्टिक घटक आढळतात. हे घटक आपल्या शरीरास अनेक रोगांपासून दूर ठेवण्यास मदत करतात.
‘व्हिटामिन डी’ शरीरासाठी खूप महत्वाचा घटक आहे. शरीरात ‘व्हिटामिन डी’ची कमतरता असल्यास बरेच आजार उद्भवतात. नैसर्गिकरित्या ‘व्हिटामिन डी’ आढळणाऱ्या भाज्या आणि फळे तशी कमीच आहेत. यापैकीच एक भाजी आहे मशरूम. मशरूममध्ये ‘व्हिटामिन डी’ मुबलक प्रमाणात आढळते. दररोज मशरूम खाल्ल्याने शरीराला आवश्यक तितके ‘व्हिटामिन डी’ नैसर्गिकरित्या मिळू शकते. ‘पांढरे मशरूम’ आणि ‘पोर्टेबेला मशरूम’मध्ये ‘व्हिटामिन डी’ चांगल्या प्रमाणात आढळते.
न्यूट्रिशनिस्ट म्हणतात की, आपण आपल्या आहारात अनेक प्रकारच्या गोष्टी समाविष्ट केल्या पाहिजेत. मशरूम ही एक खाण्यास चविष्ट आणि बनवण्यास अतिशय सोपी भाजी आहे. यातील पौष्टिकता टिकवण्यासाठी मशरूम कुठल्याही प्रकारे शिजवणे फायदेशीर ठरते. ‘मशरूम’च्या विविध पाककृती बनवणे खूप सोपे आहे. आपण आपल्या रोजच्या आहारात कोशिंबीर, भाजी किंवा सूपसारख्या पदार्थांतून ‘मशरूम’चा समावेश करू शकता.
संबंधित बातम्या :
मिठाई खायची इच्छाय, पण शुगरचा प्रॉब्लेम? नो टेन्शन ही फळं ट्राय करा!https://t.co/lxsw0Honnb#fruits #Sugar #Health #Immunity
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 14, 2020
(Pregnant women should follow this things while eating mushrooms)