मुंबई : प्रेग्नेंट (Pregnant) आहोत हे समजता क्षणी आता आपल्या बाळासाठी काय केलं पाहिजे, काय खालं पाहिजे, कुठल्या गोष्टी केल्या पाहिजे ज्यामुळे आपलं बाळ निरोगी आणि हेल्दी होईल, असा प्रश्न प्रत्येक गरोदर महिलेला (Pregnant Women) पडतो. अशावेळी घरात मोठे मंडळी असतात हे सगळं सांगायला. अगदी डॉक्टरही वेळोवेळी सांगत असतात काय खालं पाहिजे काय टाळायला पाहिजे. फळंही (Fruits) आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. पण सर्व साधारण पणे कुठली फळं या दिवसात खावी आणि टाऴावीत याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.
प्रेग्नेंट असताना उष्ण पदार्थ टाळायला पाहिजे. मग तसंच उष्ण आणि पचायला जड अशी फळं खायला नको. त्यामुळे गर्भाला त्रास होण्याची अगदी सुरुवातीच्या काळाच गर्भपात होण्याची भीती असते. म्हणून पपई, आंबा, अननस आणि द्राक्ष ही फळं या दिवसांमध्ये खाणं टाळावीत.
व्हिटॅमिन-सीयुक्त फळं खाण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येतो. तसंच फायबर, फोलेट आणि लोह यांचा चांगला स्त्रोत असलेली फळं आई आणि बाळासाठी खूप फायदेशीर असतात. त्यामुळे रोज आहारात फळाचा समावेश करावा. मोसंबी, चिकू, कलिंगड, स्ट्रॉबेरी, डाळिंब, सफरचंद, सीताफळ, पेअर, पेरु, किवी आणि केळी ही फळं खायला पाहिजे. तर ब्लूबेरी, चेरी, अवोकाडो ही फळं पण तुम्ही खाऊ शकता.
प्रत्येकाची शरीराची अवस्था, प्रेग्नेंसीमधील समस्या, तुम्हाला इतर होणार त्रास यानुसार तुमचा आहार असावा. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलीही गोष्ट करु नका.
गर्भवती असताना सेक्स करु नये, तो धोकादायक असल्याचं मेडिकल सायन्स साफ नाकारतं. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, गर्भधारणेच्या कुठल्याही स्टेजवर करण्यात आलेला सेक्स हा सुरक्षित असू शकतो. दाम्पत्यांना तोपर्यंत घाबरण्याची गरज नाही, जोवर गर्भधारणेत काही मोठी समस्या नसेल. गर्भपाताचा धोका त्याचवेळी असतो, ज्यावेळी ब्लिडींग जास्त प्रमाणात होतं. अशा परिस्थितीत डॉक्टरांशी तातडीनं संपर्क साधणं गरजेचं आहे.
इतर बातम्या :