दह्यापासून तयार करा ‘या’ 4 स्वादिष्ट डिश, वाचा….

| Updated on: Mar 20, 2021 | 10:32 AM

दही हा बहुतेक लोकांच्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. दह्यामध्ये अनेक पोषक घटक असतात.

दह्यापासून तयार करा या 4 स्वादिष्ट डिश, वाचा....
दही
Follow us on

मुंबई : दही हा बहुतेक लोकांच्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. दह्यामध्ये अनेक पोषक घटक असतात. दररोज दही खाल्ल्याने केवळ ताजेतवाने वाटत नाही तर, पाचन तंत्रही ठीक राहते आणि पोटाचा त्रासही होत नाही. दही ऑस्टिओपोरोसिस, रक्तदाब, केस आणि हाडे यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. दह्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, राइबोफ्लेविन, व्हिटामिन बी 6 आणि व्हिटामिन बी12 या पोषक घटकांचे प्रमाण अधिक असते. (Prepare 4 delicious dishes from Curd)

जेवणात रोज दही खाणे आवश्यक आहे. दही खाल्ल्यामुळे शरीरातील समस्या दूर व्हायला मोठी मदत होते. दही पौष्टिक असल्यामुळे आरोग्यासंबधी आणि सौंदर्यासंबधित समस्यांवरदेखील दही खाणे हा उत्तम उपाय आहे. केसातील कोंड्यापासून त्वचा कोमल करण्यासाठी दह्याचा उपयोग होतो. रोज दह्यात गूळ किंवा खडीसाखर टाकून किंवा लस्सीच्या स्वरुपात दही खाल्ल्याने ते सौंदर्यवर्धक देखील ठरते. आज आम्ही तुम्हाला दह्यापासून तयार करण्यात येणाऱ्या 4 स्वादिष्ट डिश सांगणार आहोत.

-पॅनमध्ये थोडेसे लोणी गरम करून त्यात 1 मध्यम आकाराचा चिरलेला कांदा आणि एक टोमॅटो घालून 2 मिनिटे गरम करा. आता त्यात लाल तिखट आणि मीठ मिसळा. त्यात कढीपत्ता घाला आणि पुन्हा एक मिनिट शिजवा. यानंतर आता त्यात दही मिसळा अशाप्रकारे मसालेदार दही तयार होईल.

-एक कप तांदूळ 2-3 मिनिटे प्रेशर कुकरमध्ये शिजवा. त्यानंतर तांदूळ मॅश करुन त्यात 2 कप दही मिसळा. आता कढईत थोडे तेल गरम करून त्यात अर्धा चमचा जिरे आणि मोहरी घाला. यानंतर आता लाल तिखट, एक चिमूटभर हिंग, किसलेले आले आणि मुठभर कढीपत्ता घाला. दही तांदूळ मिश्रणात हे घाला.

-थोडी पालक घ्या पालक 2 मिनिटे पाण्यात उकळा. त्यामध्ये 300 ग्रॅम दही घाला आणि त्यात 1 चमचा जिरेपूड, अर्धा चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि चिरलेली मिरची घाला आणि खा

-दररोज दही खाल्ल्याने उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो. त्याचबरोबर हृदयाशी संबंधित आजारांपासून दूर राहण्यासाठीही दही उपयुक्त आहे.

-केसांवर आणि त्वचेवर दही लावल्याने त्याचे चांगले परिणाम दिसू लागतात. डोक्यातील कोंडा टाळण्यासाठी केसांना दही लावणे फायदेशीर ठरते. यासाठी केसांना दही लावून अर्ध्या तासाने केस धुवावे.

-दह्यामध्ये फॅटचे प्रमाण अधिक असते. दह्यामध्ये दुधासारखेच पोषक घटक असतात. दह्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे दात आणि हाडेही बळकट होतात.

संबंधित बातम्या : 

(Prepare 4 delicious dishes from Curd)