मुंबई : आपण सर्वजणच फळे खाल्ल्यानंतर त्याचे साल फेकून देतो. मात्र, आपल्याला माहिती आहे का याच फळांच्या सालीपासून विविध फेस मास्क तयार होऊ शकतात. आपल्या चेहऱ्यासाठी अत्यंत चांगले आहे याच्यापुढे महागडे फेशियल आणि ब्रँडेड क्रीमही अपयशी ठरू शकतात. त्यातील पोषक घटक आपली त्वचा निरोगी बनवते आणि चेहर्यावर नैसर्गिक चमक देखील येते. (Prepare from fruit peel Face packs will have benefits to the skin)
-केळ्याची साल त्वचेवर रगडल्यास त्वचेवरील चमक वाढते आणि सुरकुत्या देखील कमी होतात. सोबतच चेहऱ्यावरील मुरुम आणि डागांची समस्याही हळूहळू दूर होण्यास मदत मिळते. केळ्याची साल मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटा आणि पेस्ट तयार करा. तुमचे केस तेलकट असल्यास यामध्ये कोरफड मिक्स करा. केळीची साल आणि कोरफड एकत्र करून लावा त्यामुळे त्यामुळे तुमच्या चेहऱ्याची त्वचा मऊ आणि मुलायम होईल.
-लिंबूचे साल क्लीन्झर म्हणून उत्तम प्रकारे कार्य करते. लिंबाचे साल सुकवून घ्या आणि त्याचे पावडर करता करा. हे पावडर आपल्या फेस पॅकमध्ये म्हणून देखील वापरू शकतो. परंतु लिंबाची साल त्वचेसाठी आम्ल आणि तीक्ष्ण देखील असू शकते, म्हणून चेहऱ्यावर लावण्यापूर्वी ते हातावर चोळणे महत्वाचे आहे.
-संत्रीची साल सुकवून घ्या आणि त्याचे पावडर तयार करा या पावडरमध्ये मध आणि दूध मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. थोडया हलक्या हातांनी मसाज करा, कारण फेसमास्कबरोबरच हे चांगले स्क्रब आहे. मसाज केल्यानंतर ते कोरडे होऊ द्या. नंतर कोमट पाण्याने तोंड धुवा. संत्री हे व्हिटॅमिन सीचा चांगला स्रोत मानला जातो.
-आंब्याच्या सालाचे थोडेसे पीठ करून घ्या त्याची पेस्ट तयार करा त्यात मध मिसळा आणि गळ्यापासून तोंडावर लावा. कोरडे झाल्यानंतर कोमट पाण्याने धुवा. आंब्यामध्ये अँटीऑक्सिडेंट आणि अँटीइन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत जे त्वचेवर बॅक्टेरियाच्या बुरशीपासून बचाव करतात तसेच वृद्धत्वाचे परिणाम कमी करतात.
-पपईची साल स्वच्छ करून बारीक करून घ्या आणि पेस्ट तयार करा. मग त्यात लिंबू आणि मध घाला आणि चेहऱ्यावर लावा. जर आपल्याकडे वेळ नसेलतर असेल तर आपण हलक्या हातांनी त्वचेवर देखील घासू शकता. जे कोरड्या त्वचेला ओलावा देते. त्वचेची टॅनिंग देखील काढून टाकते.
संबंधित बातम्या :
खरोखरच बटाटा खाल्ल्याने वजन वाढते का? वाचा !https://t.co/rs7ABgm626 #potato | #health | #Weightloss | #Food | #lifestyle |
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 4, 2021
(Prepare from fruit peel Face packs will have benefits to the skin)