मुंबई : राजमा खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. राजमामध्ये प्रथिने मोठ्या प्रमाणात असतात. राजमाची भाजी तयार करूनही आपण खाऊ शकतो. तसेच सूपमध्ये देखील राजमा मिक्स करू शकतो. राजमा खाल्ल्याने तुमच्या शरीरातील प्रथिन्यांची पातळी चांगली राहते. रात्री राजमा पाण्यात भिजवून सकाळी आपण खाऊ शकतो. (Rajma are beneficial for maintaining a balanced protein level in the body)
-राजमा प्रोबायोटिक म्हणून काम करते म्हणजे ते खाल्ल्याने पाचन क्रिया हळू होते, जेणेकरून आपले शरीर प्रत्येक आहाराचे पोषण अॅब्जार्ज करू शकेल. परंतु याचा अधिकाधिक लाभ तुम्हाला हवे असल्यास भाजी बनवून खाण्याऐवजी उकडून खाणे अधिक चांगले आहे.
-राजमा मेंदू आणि मज्जासंस्थेसाठी देखील फायदेशीर आहे. त्यात उपस्थित थायमाइन मेंदूची क्षमता वाढवते आणि अल्झायमर सारख्या आजारांना बरे करण्यास देखील मदत करते.
-प्रथिने, फायबरने समृद्ध असलेला राजमा रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो. राजमा खाल्ल्यानंतर राजमा खाल्ल्याने टाइप -2 मधुमेहाचा धोका कमी होतो.
-राजमा खाताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की, कोणत्याही हंगामात राजमा रात्री खाऊ नये. दुपारच्या जेवणाच्या वेळी राजमा नेहमी खा. यामागचे कारण असे आहे की राजमा हे एक जड अन्न आहे जे पचनासाठी थोडे जड आहे.
– रात्रीच्या जेवणामध्ये राजमा खाल्ल्यास पोटात जडपणा, गॅस, झोपेची कमतरता, पोट साफ होत नाही, पोटदुखी, त्यामुळे शक्यतो रात्रीच्या वेळी राजमा खाल्ला नाही पाहिजे.
संबंधित बातम्या :
Face Massage | त्वचेसाठी संजीवनी ठरेल ‘फेस मसाज’, वाचा याचे फायदे…
Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो
Hair Care | थंडीच्या दिवसांत रुक्ष केसांच्या समस्येमुळे हैराण? मग ‘हे’ हेअर मास्क नक्की ट्राय करा!https://t.co/R06JFAcxU4#HairMask #HairCare #beautytips
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 29, 2020
(Rajma are beneficial for maintaining a balanced protein level in the body)