प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनाने फक्त उद्योग विश्वाचच नाही, तर सगळ्या देशाच नुकसान झालं आहे. रतन टाटा हे फक्त यशस्वी उद्योजकच नव्हते, तर त्या पलीकडच व्यक्तीमत्व होतं. रतन टाटा यांनी नेहमीच सामाजिक जाणीवा जपल्या. समाजाच आपण देणं लागतो, या विचारातून त्यांनी नेहमीच सामाजिक कार्यात भरभरुन योगदान दिलं. त्यामुळेच TATA हा ब्रांड सर्वसामान्यांना आपल्या जवळचा वाटतो. रतन टाटा यांच्या निधनाची बातमी ऐकून सगळेच हळहळले. आपल्या कोणीतरी जवळचा माणूस सोडून गेलाय अशी अनेकांची भावना आहे.
रतन टाटा आज हयात नसले तरी त्यांचे आदर्श उच्च विचार, परंपरा नेहमीच प्रेरणा देत राहतील. रतन टाटा हे सर्वच क्षेत्रातील लोकांसाठी प्रेरणेचा स्त्रोत आहेत. ते एक यशस्वी गुंतवणूकदार होते. असंख्य स्टार्टअप्समध्ये त्यांनी गुंतवणूक केली होती.
रतन टाटा यांचे प्रेरणादायक कोट्स
लोखंडाला कोणी नष्ट करु शकत नाही. परंतु गंज लागल्यास लोखंड नष्ट होऊ शकतं. त्याचप्रमाणे कोणीही व्यक्तीला नष्ट करु शकत नाही. पण माणूस त्याच्या मानसिकतेमुळे नष्ट होऊ शकतो.
लोक तुमच्यावर जे दगड फेकतात, ते उचला. त्याचा उपयोग स्मारक बांधण्यासाठी करा.
माझा योग्य निर्णय घेण्यावर विश्वास नाहीय. मी निर्णय घेतो आणि त्यानंतर त्याला योग्य ठरवतो.
ज्या दिवशी मी उड्डाणासाठी सक्षम नसेन, तो माझ्यासाठी दु:खद दिवस असेल.
जीवनात चढ-उतार हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहेत. कारण ईसीजीमध्ये सरळ रेषा येते, त्याचा अर्थ आपण जिवंत नाही असा होतो.
तुम्हाला वेगाच चालायच असेल, तर एकटे चाला. पण तुम्हाला दूरपर्यंत जायचं असेल, तर सोबत चाला.
पराभवाची भिती मनात नसणं हा जिंकण्याचा एकमेव मार्ग आहे.
प्रयत्न न करणं हे सर्वात मोठ अपयश आहे.
गोष्टी नशिबावर सोडायच्या यावर माझा विश्वास नाहीय. कठोर मेहनत आणि तयारीवर माझा विश्वास आहे.
आपलं मूळ कधी विसरु नका. जिथून तुम्ही आलात, नेहमी त्याचा अभिमान बाळगा
तुम्ही मुल्य आणि सिद्धांताशी कधी तडजोड करु नका. भले, तुम्हाला त्यासाठी कठीण रस्त्यावरुन चालाव लागेल.
तुम्हाला एक लढाई जिंकण्यासाठी एकापेक्षा जास्तवेळ लढावं लागू शकत.