मुंबईः अन्नाची नासाडी थांबवण्यासाठी न्यू्ट्रीशिएनालिस्ट लवनीत बोरा यांनी काही पर्याय सुचवले. अनेकजण सांगतात त्यापेक्षा अन्न नासाडी खूप मोठी समस्या आहे. आपल्या चुकीच्या सवयीमुळे नैसर्गिक स्त्रोतांवर अतिरिक्त ताण आणतो. यामुळे पर्यावरणाला नुकसान पोचते. अन्नाची नासाडी (food waste) म्हणजे फक्त अन्न वाया घालवणे नव्हे तर धान्य, फळ-भाज्या पिकवण्यासाठी लागलेली मजूरी, श्रम, गुंतवणूक आणि स्त्रोतांचे नुकसान आहे.
थोडक्यात काय तर अन्न वाया घालवणे म्हणजे पर्यावरणाचेही अपरिमित नुकसान आहे. होय या आपल्या बेजबाबदारपणामुळे आपण ग्रीन हाऊस उत्सर्जन आणि क्लायमेट चेंजसाठी जबाबदार ठरतो. हे थांबवण्यासाठी गरजेपेक्षा जास्तीचे म्हणजे अन्नाचा अनावश्यक साठा वा अतिरिक्त अन्न विकत घेणे बंद करायला हवे.
अन्न बचतीसाठी ‘ स्टोरेज’ वाढवण्यासाठी प्रयत्न व्हायला हवे. गरज आहे तितकेच अन्न घ्या. तुम्ही जे पिकवता ते लगेच खाऊ शकत नाही. ते अन्न फ्रीझ करा किंवा उरलेले अन्न दुसऱ्यांंच्या कामी पडू शकते असाही विचार करा. वस्तूंचा जास्तीत जास्त वापर करा. वस्तू दीर्घकाळ वापरता यायल्या हव्या. अन्नाचे कंपोस्ट़िंग करा. म्हणजे अन्नातील पोषण तत्व जमिनीत रूजवा. याच मातीतून स्वतःच्या भाज्या आणि फळे पिकवा. ‘रिसायकलिंग’ म्हणजे जुन्या वस्तूला नव्या वस्तू तयार करण्यासाठी वापर करा. या तीन तत्वावर अन्नाची नासाडी थांंबून प्रत्येकापर्यंत अन्न पुरेशा प्रमाणात पोचेल असे लवनीत बात्रा म्हणतात. कारण अन्नाची बचत ही कुणा एकाची जबाबदारी नाही तर प्रत्येकाने या कामात सहभागी व्हायला हवे.
जगात अजूनही गरीब देश.आहेत जिथल्या लोकांना पुरेसे अन्न मिळत नाही. ती मोठ्या कष्टाने जगतात. इंटरनेटवर महत्त्वाच्या आणि अधिकृत वेबसाईटवरून माहिती घ्याल तर भूकबळींची आकडेवारी, कुपोषण आणि पर्यावरणातील बदल यावरूनच ‘ अन्न बचत’ किती आवश्यक आहे हे सहज समजेल.
संबंधित बातम्या