आजकाल प्रत्येकजण वर्क फ्रॉम होम करत आहे. संपूर्ण दिवस एकाच जागी बसून काम करत असल्याने मानसिक व शारीरिकदृष्ट्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक आजार उद्भवत आहेत, अशा स्थितीत तुम्ही घरी योगासने करून स्वतःला निरोगी ठेवण्यास मदत करू शकतात. यासोबतच खानपान योग्य पद्धतीने होत नसल्याने सुद्धा अनेक आजार निर्माण होऊ शकतात. त्यामुळे दररोज पाच मिनिटे तुम्ही जर हे योगासन केल्यास आरोग्याशी संबंधित होणारे त्रास टाळू शकतात आणि आरोग्य सुधारण्यासाठी मदत होऊ शकते. आज आम्ही तुम्हाला एका सोप्या योगासनाविषयी सांगणार आहोत जे शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते.
पूर्ण चंद्रासन नियमित केल्याने शरीराचे रोगांपासून संरक्षण होते. या आसनाचा सराव केल्याने शरीराचे संतुलन, मुद्रा, लवचिकता सुधारते आणि हाडे मजबूत होतात आणि हे आसन एकाग्रता वाढवण्यासही उपयुक्त ठरू शकते. या आसनामुळे शरीरातील पचनाची क्रिया सुरळीत राहते आणि वजन कमी करण्यास मदत होते. जर तुम्हाला पाठदुखी किंवा मणक्याचा त्रास असेल तर योगाचार्यांचा सल्ला घेऊनच पूर्ण चंद्रासन करा. जर तुम्हाला हाडांना दुखापत किंवा ऑस्टिओपोरोसिस असल्यास हे आसन करू नका. याशिवाय गंभीर आजाराने ग्रस्त असाल तसेच गर्भवती महिलांनी तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय पूर्ण चंद्रासन करू नये.
सर्व प्रथम, जमिनीवर सरळ उभे रहा.
नंतर डावा पाय उजव्या पायापासून दोन फूट दूर घ्या.
लक्षात ठेवा, तुम्हाला अजूनही तुमचे हात सरळ ठेवावे लागतील.
आता तुमचे हात आणि पाय हळू हळू त्रिकोणी मुद्रेत घेऊन जा.
आता तुमच्या उजव्या हाताची बोटे जमिनीपासून थोडी वर ठेवा.
तुमच्या उजव्या हाताची बोटे आणि उजव्या पायाची बोटे यामध्ये सुमारे दीड फूट अंतर असावे.
एक हात वरच्या दिशेने हलवा आणि त्याच स्थितीत दुसरा वरच्या दिशेने हलवा.
आता तुमचा डावा पाय हवेत वर करा.
काही सेकंद या स्थितीत राहून पुन्हा सामान्य स्थितीत परत या.