Good Relationship : कोणतेही नाते हे सत्य आणि विश्वासावर टिकलेले असते. कोणत्याही नात्यातला विश्वास निघून गेला तर ते नाते टिकू शकत नाही. छोटे भांडण झाले तरी काहीवेळा नाते लगेच तुटतात. नाते तुटण्यासाठी आपणच जबाबदार असतो. लक्षात ठेवा नात्यातील प्रत्येक गोष्ट इतरांसोबत शेअर करणे ही मोठी चूक आहे. रिलेशनशीपमधल्या काही गोष्टी या स्वत:कडेच ठेवल्या पाहिजेत. परंतु लोकांना त्याचे महत्त्व समजत नाही आणि ते इतर लोकांसोबत शेअर करतात. नात्यातील कोणत्या गोष्टी इतरांकडे शेअर करायच्या नाहीत जाणून घ्या.
दोघांमध्ये जर कोणताही वाद झाला असेल तर तो इतरांना सांगणे ही वाईट सवय असू शकते. कारण तुमची बाजू तुम्ही सांगता. पण समोरच्या व्यक्तीची बाजू त्याला माहित नसते. त्यामुळे त्यावरुन तो तुम्हाला त्याचं मत सांगू शकतो. अगदी किरकोळ भांडणामुळे ही नाते तुटू शकते. जर तुम्ही तुमच्या जोडीदारावर एखाद्या गोष्टीमुळे नाराज असाल तर तुम्ही जोडीदारासोबतच त्यावर बोलले पाहिजे.
तुमच्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसेल, तर सर्वांसमोर याबद्दल बोलू नका. यामुळे तुमच्या जोडीदाराला वाईट वाटू शकते. अनेक वेळा अशा गोष्टींमध्ये लोकं तुमची साथ देण्याऐवजी तुमची खिल्ली उडवू शकतात. त्यामुळे तुम्ही दोघांनी मिळून या परिस्थितीचा सामना करणे चांगले होईल.
नाते कोणतेही असो ते विश्वासावर टिकते. त्यामुळे तुमच्या वैयक्तिक गोष्टी कोणासोबतही शेअर करु नका. दोघांमधला विश्वास कायम ठेवा. चांगल्या-वाईट गोष्टी विनोदाने इतरांसोबत शेअर करू नका. पार्टनरच्या कोणत्याही सवयी या इतरांसोबत शेअर करु नका. असं केल्याने तुमच्यातील नात्यात कटुता येऊ शकते. वाद झाले तरी दोघांनी मिळून तोडगा काढा. तिसऱ्याची मदत घेऊ नका.