मुंबईः आजच्या काळात विवाह झाल्यानंतर काही दिवसांनी घटस्फोट होणे ही खूप सामान्य गोष्ट झाली आहे. वैवाहिक (Marriage Life)आयुष्यात काही गोष्टी घटस्फोटाला (Divorce) कारणीभूत होतात. आताही आम्ही तिच कारणं सांगणार आहे जी घटस्फोटाला कारण ठरतात.
देशात घटस्फोटांचे प्रमाण वाढत असतानाच अभिनेता धनुष (Actor Dhanush) आणि ऐर्श्वया रजनीकांत यांचा लग्नाच्या 18 वर्षानंतर घटस्फोट झाला आहे. त्याच्या आधीही अमिर खान आणि किरण राव यांनीही विवाहाच्या प्रदीर्घ कालाखंडानंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला. बड्या नेत्या अभिनेत्यांसारखेच काही जोडपीही आता लग्नाला दहा-दहा वर्षे होऊनही घटस्फोट घेण्याचा निर्णय घेत आहेत. पूर्वीच्या काळी आपल्या मुलांचा विचार करून विभक्त होण्याच्या निर्णयापासून लोकं लांब होती, मात्र आता अशी परिस्थिती राहिली नाही.
सध्याच्या काळातील जोडीदारांचे असे मत आहे की, लग्नामुळे आयुष्यातील इतकी वर्षे वाया गेली, त्यामुळे आता वेळ वाया जाऊ द्यायचा नाही. त्यांची दुसरी कारणेही असू शकतात, ज्यामुळे त्यांचा घटस्फोट होतो. या सगळ्यांपेक्षा काही कारणे खूप वेगळी असतात, तिच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
नात्यात कटूता येणे आणि दुरावले जाणे यासाठी कारण असते ते एकमेकांना समजून न घेणे. लग्नानंतर तयार झालेल्या नात्यामध्ये एकमेकांना समजून घेण्यापेक्षा नात्यात एकाच गोष्टीवर वाद घालत राहणे हेच कारण नाते दुरावण्यात होते. नात्यातील वाद मिठवणे सोपे असते पण ते केले जात नाही. दोघे एका घरात असूनही मग ते दुभंगलेले असतात. नात्यात आपल्या जोडीदाराचे म्हणणे ऐकून घेऊन त्याला किंवा तिला काय म्हणायचे आहे ते समजून घ्या. शांत राहून समजून घेतले तर काही गोष्टींचा गैरसमज सहजपणे दूरही होऊ शकतो.
विवाहानंतर काही दिवस जोडीदाराकडून कोणत्याही अपेक्षा ठेवल्या जात नाहीत. मात्र काही काळ गेला की, अपेक्षा वाढू लागतात. वैवाहिक आयुष्यात अपेक्षा पूर्ण झाल्या नाही तर नात्यात कटुता येण्यास सुरुवात होते. दोघांनी पूर्ण करण्याच्या गोष्टीही मग एकट्याला कराव्या लागतात. त्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी वेळ द्या, किती वेळ लागणार आणि त्या अपेक्षा कधी पूर्ण होतील याची सगळी माहिती आपल्या जोडीदाराला द्या.
कोणत्याही जोडीदाराचे नाते संपते ते एकमेकांना दिलेल्या धोक्यामुळे. नात्यात धोका देणे हे कुणालाही आणि कोणत्याही नात्याला मान्य नसते. काही गोष्टींनी हे लक्षात आले आहे की,काही काही लोक लग्नानंतर कित्येक वर्षांनी तिसऱ्याच माणसाला जवळ करतात. म्हणजे आपण गोष्ट करतो आहे ती विवाहबाह्य संबंधांची. विवाहबाह्य संबंधाची माहिती आपल्या जोडीदाराला समजली तर घटस्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही, मग त्या लग्नाला दहा वर्षे होऊ देत नाहीतर पंधरा वर्षे होऊ देत घटस्फोट हा होतोच.
संबंधित बातम्या