Relationship tips: या काही महत्त्वाच्या टिप्स ज्या तुम्हाला सांगतील की तुमचा पार्टनर तुमच्यापासून दुरावला आहे की नाही? जाणून घ्या

| Updated on: Feb 25, 2022 | 11:10 PM

Relationship tips: अनेकदा साखरपुडा झाल्यावर आपल्या पार्टनरचे वागणे बदलून जाते. अशा वेळी लग्नाच्या निर्णयाबद्दल अनेकदा संभ्रम निर्माण होतो. या सगळ्या परिस्थितीमध्ये काही संकेताच्या आधारे आपण जाणून घेऊ शकतो की,आपल्या पार्टनरची आपण पहिली पसंत आहे का? किंवा आपण त्याला आवडतो की नाही?

Relationship tips: या काही महत्त्वाच्या टिप्स ज्या तुम्हाला सांगतील की तुमचा पार्टनर तुमच्यापासून दुरावला आहे की नाही? जाणून घ्या
रिलेशनशिप बद्दल काही टीप्स
Follow us on

लग्नाचा निर्णय आपल्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा निर्णय (Life tips) असतो. जर हा निर्णय घेताना जराशी जरी आपण चूक केली तर भविष्यात अनेक गंभीर परिणामांना आपल्याला सामोरे जावे लागू शकते. अनेकदा असे म्हटले जाते की, लग्न हे एका कच्चे धाग्या (Marriage tips in marathi) प्रमाणे असते. हे नाते प्रेम आणि विश्वास यांच्यावर टिकलेले असते. बहुतेक वेळा लग्न ठरवताना आपल्या पार्टनर बद्दल अनेक गोष्टी जाणून घेणे गरजेचे ठरते. लग्न जमवताना वेगवेगळ्या प्रकारची काळजी देखील घ्यावी लागते. जेव्हा लग्न अरेंज मॅरेज (arrange marriage) पद्धतीने जमवले जाते तेव्हा दोन अनोळखी व्यक्ती एकत्र येत असतात.या परिस्थितीमध्ये एकमेकांना त्यांच्याबद्दल फारशी माहिती नसते.खूप वेळ एकत्र घालवल्या नंतरच त्यांना एकमेकां बद्दल माहिती कळते व ते एकमेकांवर प्रेम करू लागतात. तसे पाहायला गेले तर लग्नाआधी अनेक गोष्टी जुळायला हव्यात तरच पुढचा संसार व्यवस्थित होऊ शकतो.

अनेकदा एंगेजमेंट म्हणजे साखरपुडा झाल्यानंतर बहुतेक वेळा असे घडते की ,आपल्या मनामध्ये ठरवलेल्या लग्नाबद्दल संभ्रम गोंधळ निर्माण होतो.आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला अशा काही संकेत विषयी सांगणार आहोत,ज्यामुळे तुम्हाला भविष्यात मदत होणार आहे. या संकेतांच्या आधाराने तुमच्या पार्टनरची तुम्ही पहिली निवड आहात की नाही हे कळेल तसेच तुमचा पार्टनर तुम्हाला पसंत करतो की नाही? याबद्दल सुद्धा कळेल चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल…

छोट्या छोट्या गोष्टींवर भांडण करणे

बहुतेक वेळा जर नात्यातील एखाद्या व्यक्ती आनंदी नसेल तर अशा वेळी ती/ तो व्यक्ती वारंवार छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडण करू लागतो. ती व्यक्ती छोट्या छोट्या गोष्टींना अनेकदा मोठ्या बनवण्याचा प्रयत्न करते. अशा प्रकारच्या घटना जर तुमच्या बाबतीत घडत असतील तर तुम्हाला निर्णय बदलावा लागेल असा संकेत देणारा ठरतो. तसे कोणतेही नाते जर आपल्याला संपवायचे असेल तर अशावेळी आपल्या पार्टनर सोबत चर्चा करणे गरजेचे आहे. जर त्या व्यक्तीने आपले वर्तन बदलले नाही तर लग्नानंतर सुद्धा असेच वर्तन असेल तर तुमचे आयुष्य तणावग्रस्त राहण्याची शक्यता असते अशावेळी आपल्याला निर्णय तपासून पाहणे आवश्यक आहे.

वारंवार तुम्हाला टाळणे

बहुतेक वेळा जर तुमचा पार्टनर तुम्हाला पसंत करत नसेल तर अशावेळी तो तुम्हाला टाळण्याचा प्रयत्न करतो. जर एखाद्या व्यक्तीने एखाद्या कारणामुळे, मजबूरीत तुमच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला असेल तर तो तुमच्याशी मोकळेपणाने बोलत नाही. चर्चा करत नाही त्याला किंवा तिला तुमच्या मध्ये कोणत्याही प्रकारचा इंटरेस्ट नसतो. अनेकदा दोन अनोळखी व्यक्ती सुखी जीवनाचे व संसाराचे स्वप्न पाहत असतात तेव्हा ते एकमेकांसोबत कसा वेळ घालवता येईल याबद्दल प्लॅनिंग करत असतात. परंतु जर तुमच्या बाबतीत उलट घडत असेल , तुमचा पार्टनर तुम्हाला इग्नोर करत असेल टाळत असेल तर अशावेळी समजून घ्या की तुमचे लग्न जबरदस्तीने होत आहे किंवा तुम्ही त्याची किंवा त्याचा पहिली पसंत नाहीये.

प्लॅन कॅन्सल करणे

अनेकदा असे मानले गेले आहे की ,जेव्हा एखादे नाते नवीन असते तेव्हा अनेक जण एकमेकांना भेटण्यासाठी प्लॅनिंग करत असतात. जास्तीत जास्त वेळ एकत्रित कशा पद्धतीने घालवता येईल याबद्दल प्लॅनिंग करतात परंतु जर तुमचा पार्टनर तुम्हाला कोणतेही प्लॅनिंग करत असताना नेहमी नकार देत असेल तर याचा अर्थ काहीतरी गडबड आहे. जर तुम्ही त्याला किंवा तिला आवडत नसल्यास तो तुमच्यासोबत फिरण्यास लवकर तयार होणार नाही आणि म्हणूनच जर तुम्ही कोणत्याही प्रकारचा प्लान करत असाल तर तो किंवा ती नेहमी कॅन्सल करेल.

टिप्स: वरील माहिती सर्वसामान्य स्वरूपाची सांगण्यात आलेली आहे जर तुम्हाला तुमच्या पार्टनर बद्दल काही वेगळे संकेत जाणवत असल्यास अशा वेळी तज्ञमंडळीशी अवश्य चर्चा करा. टीव्ही 9 मराठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा सल्ला देत नाही आहे.

Beauty Care: चेहऱ्याची काळजी करताय? कडूलिंबासोबत या पदार्थांचा करा आवर्जून वापर, त्वचा नैसर्गिकरीत्या उजळून जाईल!

Holi 2022: रंगामुळे केसांना हानी पोहचू नये म्हणुन अशाप्रकारे घ्या आपल्या केसांची काळजी, या काही ब्युटी टीप्स फॉलो करा

आई आणि बाळाच्या चांगल्या आरोग्यासाठी नारळ पाणी बेस्ट! जाणून घ्या गरोदरपणामध्ये नारळ पाणी पिण्याचे 10 फायदे