उन्हाळ्याचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे या ऋतूत कडक सूर्यप्रकाशामुळे तुमची त्वचा टॅनिंग किंवा काळ्यापणाची शिकार होते. यामुळे अनेकदा संवेदनशील त्वचेच्या लोकांनाही सनबर्नच्या वेदनेला सामोरे जावे लागते. अशातच आज आम्ही तुमच्यासाठी मिल्क पावडर फेस मास्क घेऊन आलो आहोत. मिल्क पावडर फेस मास्कचा वापर केल्याने तुमच्या त्वचेचे रक्षण होते तसेच सनबर्न आणि टॅनपासून मुक्ती मिळते. दुधाच्या पावडरमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडेंट गुणधर्म असतात. मिल्क पावडर फेस मास्कमुळे तुमची त्वचा मऊ आणि स्वच्छ होते तसेच डागही दूर होतात. जर तुम्हाला तेलकट त्वचेचा त्रास होत असेल तर मिल्क पावडर तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकते, तर चला जाणून घेऊया मिल्क पावडर फेस मास्क कसा बनवावा.
(डिस्क्लेमर: दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)