मुंबई : उन्हाळ्यात आपल्या केसांची काळजी घेणे आवश्यक आहे. या हंगामात केस कोरडे आणि निर्जीव होतात. कोरडे आणि निर्जीव केस दूर करण्यासाठी आपण विविध उपाय करतो. मात्र, त्याचा काही फायदा होत नाही. कोरडे आणि निर्जीव केसांची समस्या दूर करण्याासाठी तांदळाचे पाणी अत्यंत फायदेशीर आहे. तांदळाचे पाणी अमीनो अॅसिड, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्ससह समृद्ध असते. (Rice water is beneficial for good hair)
तांदळाचे पाणी कसे बनवायचे
तांदळाचे पाणी तयार करण्यासाठी तांदूळ शिजवताना तुम्हाला आणखी जास्त पाणी घालावे लागेल, जेव्हा तांदूळ चांगले उकळायला लागले की, त्यातील अतिरिक्त पाणी काढून घ्या. हे पाणी केस आणि त्वचेसाठी वापरले जाऊ शकते. हे पाणी आपल्या केसांसाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर आहे. याशिवाय तुम्ही त्वचेची देखभाल करण्याच्या हे पाणी रूढीमध्ये क्लीन्सर आणि टोनर म्हणूनही वापरू शकता.
केस मऊ होतात
तांदूळ पाणी केसांसाठी खूप फायदेशीर आहे. जर तुमचे केस कोरडे व निर्जीव असतील तर तांदळाचे पाणी वापरा. हे आपल्या केसांमध्ये नैसर्गिक कंडिशनरसारखे कार्य करेल. यात भरपूर पोषक घटक असतात जे केसांच्या वाढीस मदत करतात. केस मऊ बनविण्यात देखील मदत होते.
केस जाड आणि मजबूत होतील
तांदळाच्या पाण्यात कर्बोदक आणि इनोसिटॉल असते. ज्यामुळे केस मजबूत होण्यास तसेच दाट होण्यास मदत होते. सुमारे 10 ते 15 मिनिटे हलकी हाताने केसांच्या टाळूची मालिश करा. मग पाण्याने केस धुवा. आपणास हवे असल्यास तांदळाचे पाणी आपल्या केसांमध्ये लावा आणि थोडावेळ ठेवा आणि नंतर केस शैम्पूने धुवा. आठवड्यातून दोन ते तीन दिवस हा उपाय करा. हा उपाय केल्यास परिणाम लवकरच दिसून येतील.
संबंधित बातम्या :
Hair Fall | मधुमेहामुळे देखील उद्भवू शकते केस गळती, रक्तातील साखर नियंत्रित करणे आवश्यक!
चपाती खाल्यानंतर ‘ही’ चूक अजिबात करु नका, आरोग्यास होऊ शकतं नुकसानhttps://t.co/YhmdUa5Ut6 #HealthTips | #Health | #Lifestyle | #Tv9Marathi
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 31, 2020
(Rice water is beneficial for good hair)