उपवास म्हंटल कि आपल्या प्रत्येकाच्या घरात साबुदाणा खिचडी बनवलेली असते. त्यात साबुदाणा खिचडी ही आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला आवडीची डिश आहे. लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांना साबुदाणा खिचडी आवडते. कारण साबुदाण्यापासून विविध प्रकारचे पदार्थ बनवले जात असून या बनवलेल्या पदार्थांची स्वतःची एक वेगळीच चव असते. अश्यातच आपल्या सगळ्यांचा असा समज आहे कि साबुदाण्याचे प्रकार फक्त उपवासाच्या दिवशी खाल्ले जातात. पण तसं काही नाहीये तुम्हाला हवं असल्यास साबुदाण्याचे हे पदार्थ इतर दिवशीही बनवून खाऊ शकतात.
तसेच याच्या वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद तुम्ही केव्हाही घेऊ शकता. आज आम्ही तुम्हाला साबुदाणा थाळीपीठाची रेसिपी सांगणार आहोत. जी बनवायला अगदी सोपी आहे. तुम्ही कधी साबुदाणा थाळीपीठ बनवले नसेल तर आम्ही नमूद केलेल्या पध्दतीने एकदा ही डिश तयार करून पहा, अजिबात भर पडणार नाही. पुदिन्याची चटणी किंवा दह्याबरोबर सर्व्ह करा. घरातल्या सदस्यांनी या पदार्थांची चव चाखल्यावर कौतुक केल्याशिवाय राहणार नाही.
साहित्य :
साबुदाणा – १ कप
शेंगदाणे – १/४ कप
उकडलेले बटाटे – २
शिंगाड्याचे पीठ – १/४ कप
जीरा – १ टीस्पून
काळी मिरी पूड- १/२ टीस्पून
किसलेले आले – १ टीस्पून
हिरवी मिरची बारीक चिरलेली – २
कोथिंबीर – २ टेबलस्पून
लिंबाचा रस – १ टीस्पून
तेल – आवश्यकतेनुसार
सेंधव मीठ – चवीनुसार
कृती
– सर्वप्रथम साबुदाणा स्वच्छ धुवून ४-५ तास पाण्यात भिजत ठेवावा. यामुळे साबुदाणा मऊ होईल आणि चांगला फुलून जाईल.
– आता एका कढईत शेंगदाणे घालून चांगले भाजून घ्या. यानंतर चांगले भाजल्यानंतर त्यांना एका भांड्यात काढून घ्या.
– भाजलेले शेंगदाणे थंड झाल्यावर त्यांची सालं काढून घ्या. त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात हे शेंगदाणे घेऊन थोडे बारीक वाटून घ्या.
– यानंतर उकडलेले बटाटे मॅश करून बारीक केले शेंगदाणे पूड घालावे. दोन्ही चांगले मिक्स करा. त्यानंतर या मिश्रणात जिरे, काळी मिरी पावडर घालून मिक्स करावे.
– नंतर मिश्रणात किसलेले आले, हिरवी कोथिंबीर आणि मीठ घालून छान मिक्स करावे. आता मिश्रणात एक कप शिंगाड्याचे पीठ घालून सर्व साहित्य नीट मळून घ्या.
– थाळीपीठा करण्यासाठी पीठ तयार झाले आहे. आता एक बटर पेपर घेऊन त्याला थोडे तेल लावा जेणेकरून थाळीपीठ करताना चिकटणार नाही.
– यानंतर पीठाचा एक मोठा गोळा घेऊन बटर पेपरवर हाताच्या बोटाच्या साहाय्याने गोलाकार पद्धतीने थापून घ्या.
– हे लक्षात ठेवा की थाळीपीठ जास्त पातळ नसावे, कारण थाळीपीठ खूप पातळ आल्यास भाजताना करपू शकत किंवा भाजून झाल्यावर कडक देखील होऊ शकत.
– आता मध्यम आचेवर नॉन स्टिक पॅन/तवा गरम करा. तवा गरम झाल्यावर त्यात थोडं तेल घालून सगळीकडे पसरवा.
– यानंतर साबुदाणा थाळीपीठ घालून मध्यम आचेवर भाजून घ्या. आता थाळीपीठ हळूहळू दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.
– त्यानंतर एका प्लेटमध्ये तयार झालेले थाळीपीठ काढून घ्या. अश्या पद्धतीने सगळे थाळीपीठ तयार करून घ्या. त्यानंतर पुदिन्याची चटणी किंवा दह्याबरोबर सर्व्ह करा.