Saturn Transit In Pisces : शनिदेवाला सर्व ग्रहाताील क्रूर ग्रह आणि कर्मफळ देणारा दाता म्हटलं जातं. शनिदेवाची चाल अत्यंत धीमी असते. त्यामुळेच ते कोणत्याही राशीत अडीच वर्ष राहतात. यावेळी शनिदेवा आपल्या मूळ राशी त्रिकोण राशी कुंभमध्ये विराजमान आहे. त्यानंतर 2025 मध्ये गोचर करून देवगुरू बृहस्पतीची राशी मीनमध्ये प्रवेश करेल. त्यानंतर तब्बल अडीच वर्ष या राशीत राहतील.
शनिदेव 29 मार्च 2025 रोजी कुंभ राशीतून निघून मीन राशीत प्रवेश करेल. मीन राशीमध्ये प्रवेश केल्यानंतर मकर राशीवाल्यांवरील शनीची साडेसाती संपुष्टात येईल. मेष राशीवरील साडेसातीचा प्रारंभ होईल.
शनिदेवाचं मीन राशीत गोचर करणं वृषभ राशीवाल्यांसाठी शुभ फलदायी होऊ शकतं. या राशींच्या लोकांच्या सर्व समस्या दूर होतील. त्यांच्या जुन्या इच्छाही पूर्ण होणार आहे. करिअर आणि व्यवसायात त्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. धन संपत्तीची कमी दूर होईल. अडलेली कामे मार्गी लागतील.
कर्क राशीच्या लोकांसाठी शनिदेवचा मीन राशीत प्रवेश शुभ ठरू शकतो. कर्क राशीच्या लोकांना शनीच्या तावडीतून मुक्ती मिळेल. त्यामुळे त्यांच्या जीवनातील सर्व अडचणी आणि संकटे दूर होतील. कामकाजापासून ते वैयक्तिक जीवनापर्यंत, सर्वत्र आनंदी आणि समृद्ध निर्माण होईल. याशिवाय, पद-प्रतिष्ठेत वाढ होईल.
शनिदेवच्या राशी परिवर्तनामुळे वृश्चिक राशीच्या लोकांना शनीच्या ढैय्येपासून मुक्ती मिळेल. यामुळे या राशीच्या लोकांच्या प्रेम संबंधात गोडवा येईल. ज्यांचा विवाह होऊ शकलेला नाही, त्यांना त्यांच्या मनासारखा जीवनसाथी मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्या नोकरीत बदल होऊ शकतात. व्यापारात विस्तार आणि आर्थिक लाभाच्या शक्यता निर्माण होतील.
शनिदेवच्या मीन राशीतील गोचरामुळे मकर राशीच्या लोकांवरील शनीची साडेसाती संपेल. ज्यामुळे या राशीच्या लोकांचे अडलेले काम पुर्ण होतील आणि अडलेला पैसा मिळेल. 2025 मध्ये छोट्या छोट्या सहलींचे योग येतील. या काळात विदेश प्रवासाच्या शक्यताही आहेत. पूजा आणि धार्मिक कार्यात रुचि वाढेल. अचानक धन लाभ होईल आणि आर्थिक स्थितीत सुधारणा होईल.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)