scuba diving : स्कुबा डायविंगसाठी प्रसिद्ध आहेत भारतातील ही 5 ठिकाणं

| Updated on: Feb 26, 2024 | 5:50 PM

scuba diving in india : स्कुबा डायविंग हा अनेकांचा छंद असू शकतो. पण तुम्ही एकदा तरी याचा आनंद नक्कीच घेतला पाहिजे. समुद्रातील जग पाहण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. स्कुबा डायविंग करण्यासाठी भारतात अनेक ठिकाणे आहेत. जे तुम्हाला याचा चांगला अनुभव देऊ शकतात.

scuba diving : स्कुबा डायविंगसाठी प्रसिद्ध आहेत भारतातील ही 5 ठिकाणं
Follow us on

scuba diving : मालदीव आणि भारत या दोन्ही देशांमधील संबंध बिघडल्यानंतर आता भारतीय लोकांनी मालदीवकडे पाठ फिरवली आहे. मालदीव हे भारतीय पर्यटकांसाठी अतिशय महत्त्वाचे ठिकाण होते. पण आता भारतीय पर्यंटकांची संख्या पाचव्या स्थानावर पोहोतली आहे. मालदीवमधील समुद्र किनारे खूप सुंदर आहेत. या ठिकाणी स्कुबा डायविंग करण्यासाठी खूप लोकं जात असतात. पण आम्ही तुम्हाला भारतातील पाच असे ठिकाण सांगणार आहोत जेथे तुम्ही स्कुबा डायविंगचा अनुभव घेऊ शकता.

अंदमान

नेत्रदीपक प्रवाळ खडके आणि विविध प्रकारचे सागरी जीवन यासाठी प्रसिद्ध असलेल्या अंदमान या ठिकाणी तुम्ही स्कूबा डायव्हिंगसाठी जाऊ शकता. अंदानाम त्यासाठी प्रसिद्ध आहे. येथे तुम्ही 4-5 हजार रुपयांमध्ये हॅवलॉक बेट आणि नील बेटावर डायव्हिंग करून आरामात सागरी जग पाहू शकता.

लक्षद्वीप

लक्षद्वीपला जाण्याचा विचार करत असाल तर तिथे तुम्ही स्कुबा डायव्हिंग केलीच पाहिजे. कारण तो तुमच्या जीवनातील सर्वात सुंदर क्षण असू शकतो. तुम्ही स्वच्छ निळ्या पाण्यात समुद्रातील गोष्टी पाहू शकता. तुम्ही प्रिन्सेस रॉयल, लॉस्ट पॅराडाईज, डॉल्फिन रीफ, क्लासरूम, फिश सूप आणि मांटा पॉइंट येथे 4-7 हजार रुपयांमध्ये स्कुबा डायव्हिंगचा आनंद घेऊ शकता.

गोवा

ऑक्टोबर आणि मे महिन्यात तुम्ही गोव्यातील नाईट लाईफ अनुभवू शकता, पण जर तुम्हाला स्कुबा डायविंग करायची असेल तर तुम्ही  Suzy’s Wreck, Sail Rock, Davy Jones Locker, Grand Island, Shelter Cove आणि Turbo Tunnel या ठिकाणी भेट देऊ शकता. स्कुबा डायव्हिंगसाठी तुम्हाला फक्त 5 हजार रुपये खर्च करावे लागतील.

कर्नाटक

तुम्हाला जर समुद्रातील कासव, स्टिंग्रे आणि अगदी व्हेल शार्क पाहायचा असेल तर तुम्ही कर्नाटकातील नेत्राणी बेटावर स्कुबा डायव्हिंग करायला जावू शकता. येथे तुम्हाला स्कूबा डायव्हिंगचा चांगला अनुभव सुमारे 5,000 रुपयांमध्ये घेता येईल.

पाँडिचेरी

पाँडिचेरीमध्ये देखील स्कूबा डायव्हिंगचा थरार तुम्हाला मिळणार आहे. हे भारतातील सर्वोत्तम अंडरवॉटर डायव्हिंग डेस्टिनेशन आहे. तुम्ही कूल शार्क रीफ, अरविंद की दीवार, टेंपल रीफ यांसारख्या ठिकाणी डायव्हिंगचा आनंद घेऊ शकता. यासाठी तुम्हाला 6 ते 8 हजार रुपये खर्च करावे लागतील.