रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सात ते आठ तास झोपणे आवश्यक !

| Updated on: May 11, 2021 | 5:49 PM

सध्या जगभरात कोरोना विषाणूचे अभूतपूर्व संकट आहे. भारतासारख्या विकसनशील देशात बेड, व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन, डॉक्टर्स, मेडिसिन्स आदींची कमतरता असल्याने अनेक रुग्णांना जीव गमवावा लागतोय.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सात ते आठ तास झोपणे आवश्यक !
झोप
Follow us on

मुंबई : सध्या जगभरात कोरोना विषाणूचे मोठे संकट आहे. भारतासारख्या विकसनशील देशात बेड, व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन, डॉक्टर्स, मेडिसिन्स आदींची कमतरता असल्याने अनेक रुग्णांना जीव गमवावा लागतोय. या कोरोनाच्या काळात आपले चांगले मानसिक स्वास्थ आणि चांगली झोप अत्यंत महत्वाचे झाले आहे. अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे झोप देखील लागत नाही. मात्र, याचा आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर गंभीर परिणाम पडतो. (Seven to eight hours of sleep a night is needed to boost the immune system)

चांगल्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी योग्य झोप घेणे देखील आवश्यक आहे. ताजे फळे, भाज्या या आपल्या शरीरात उर्जा देतात ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. अगोदर खाल्लेले अन्न पचन झाल्यावरच परत अन्न खावे. कधीही ओव्हरलोडिंग करू नये. याशिवाय आपण सूप, नारळपाणी आणि काकडीचे इत्यादी हलके पर्याय खाऊ शकता. यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती चांगली होते.

आपण नेहमीच ऐकत आलो आहोत की पाणी हे आपल्या निरोगी जीवनासाठी लाभदायक आहे. परंतु, केवळ पाणी द्रव पदार्थ म्हणून न पिता, आपण ‘डेटॉक्स वॉटर’ म्हणून देखील रोज नियमाने पिऊ शकतो. ‘डेटॉक्स वॉटर’ तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी किंवा दिवसभरात कधीही पिऊ शकता. ‘डेटॉक्स वॉटर’ तयार करण्यासाठी काकडीचे काप पाण्यात घालून ठेवा. या पाण्यात लिंबाचा रस आणि पुदीन्याची पाने मिसळा. थोड्याथोड्यावेळाने हे पाणी पीत रहा. यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

चांगल्या झोपेसाठी आवश्यक गोष्टी

1. झोपेची स्थिती चांगली झोपेसाठी खूप महत्वाची आहे. म्हणूनच, ज्या स्थितीत झोपणे आपल्यासाठी आरामदायी आहे त्या स्थितीत झोपणे चांगले.

2. याशिवाय चांगल्या आणि शांत झोपेसाठी आपल्या शरीराला थकवा येणेही खूप महत्वाचे आहे. म्हणून जर आपण शारीरिक श्रम कमी केले तर थोडासा व्यायाम करा, चाला, डान्स करा किंवा संध्याकाळी पोहायला जा. यामुळे तुमची झोप चांगली होईल.

3. योग्य उशी आणि योग्य गादी देखील आपल्या चांगल्या झोपेसाठी महत्त्वपूर्ण आहे.

4. तुम्हाला जर झोप पाहिजे असेल तर योग आणि ध्यान करा. विशेष म्हणजे सात ते आठ तास झोप खूप आवश्यक आगे. त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

5. चांगल्या झोपेसाठी वेळेत झोपणे आणि उठणे हे ही आपल्या दिनचर्येत सहभागी करा.

संबंधित बातम्या : 

(Seven to eight hours of sleep a night is needed to boost the immune system)