रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर ‘या’ गोष्टी लावा!

| Updated on: Aug 06, 2023 | 3:30 PM

विशेषत: जेव्हा ऋतू बदलत असतो. आजकाल पावसाळ्यात लोकांच्या त्वचेची अवस्था बिघडू लागते. अशावेळी बाजारात मिळणाऱ्या ब्युटी प्रॉडक्ट्सपेक्षा घरीनिर्दोष चेहरा मिळणं चांगलं. मात्र, हे अतिशय सोपे आहे.

रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर या गोष्टी लावा!
चांगला आहार असेल तर त्वचेच्या, आरोग्याच्या अनेक समस्या सहज टाळता येतात त्यामुळे आपण आहारात काय खातो याकडे बारकाईने लक्ष द्यावे. काही पदार्थ स्किनसाठी अजिबात चांगले नसतात. कोणते आहेत हे पदार्थ?
Follow us on

मुंबई: फिकट आणि निर्जीव चेहऱ्यापासून सुटका मिळवण्यासाठी प्रत्येकजण काही ना काही उपाय करतो. विशेषत: जेव्हा ऋतू बदलत असतो. आजकाल पावसाळ्यात लोकांच्या त्वचेची अवस्था बिघडू लागते. अशावेळी बाजारात मिळणाऱ्या ब्युटी प्रॉडक्ट्सपेक्षा घरीनिर्दोष चेहरा मिळणं चांगलं. मात्र, हे अतिशय सोपे आहे. दिवसभर सूर्यप्रकाश, धूळ आणि माती मुळे आपली त्वचा खराब होते. त्याचबरोबर सकाळी लावलेली स्किन प्रॉडक्ट्स सायंकाळपर्यंत कमी होतात. अशावेळी चमकदार त्वचा मिळवण्यासाठी तुम्ही रात्री काही उपाय करू शकता. यासाठी तुम्ही रात्री चेहरा धुवून स्किनकेअर रूटीन फॉलो करू शकता. यामुळे चेहऱ्यावरील सर्व अशुद्ध आणि मृत त्वचेच्या पेशी दूर होतात. चला तर मग जाणून घेऊया रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर कोणत्या गोष्टी लावाव्यात…

नारळाचे तेल

आपल्या आरोग्यासाठी तसेच त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. पावसाळ्यात जर तुमची त्वचा खूप कोरडी पडत असेल तर तुम्ही रात्रीच चेहऱ्यावर नारळाचे तेल लावून झोपायला हवे. त्यामुळे तुमच्या त्वचेला रात्रभर ओलावा मिळेल. चेहऱ्याला अँटीबॅक्टेरियल गुणधर्म मिळतात ज्याने त्वचा चमकदार दिसते.

कोरफड जेल

रोज रात्री झोपण्यापूर्वी कोरफड जेल चेहऱ्यावर लावा. हे लावल्याने आपली त्वचा हायड्रेटेड होईल. तसेच मुरुम इत्यादी त्वचेशी संबंधित सर्व समस्या दूर होतील. कोरफड जेलचा परिणाम लवकरच दिसून येतो

कच्चं दूध

बहुतांश लोकांना टॅनिंगची समस्या उद्भवते. अशा वेळी त्यांच्या चेहऱ्याचा नैसर्गिक रंग मंदावतो. चेहऱ्यावरील मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी चेहरा नीट धुवून कच्चे दूध लावावे. कापसाच्या साहाय्याने चेहऱ्यावर हलका थर लावा. रात्रभर ठेवा, मग सकाळी उठून चेहरा धुवा.

गुलाब पाणी

रात्री झोपायला गेल्यावर त्याआधी गुलाबपाण्याने चेहरा पुसून घ्या. यामुळे तुमचा चेहरा स्वच्छ होतो आणि घाणीचे कण बाहेर पडतात. याचा वापर तुम्ही टोनर म्हणूनही करू शकता