मुंबई : सध्याच्या कोरोनाच्या काळात आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपण प्रत्येकजण प्रयत्न करत आहोत. त्यासाठी आपण हेल्दी आहार आणि व्यायाम देखील करत आहोत. मात्र, चांगल्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी फक्त तेवढेच पुरेशे नसून यासाठी आपल्याला चांगली झोप घेणे देखील महत्वाचे आहे. रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवण्यासाठी झोप देखील अत्यंत महत्वाची आहे. (Sleep is essential for boosting the immune system)
चांगल्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी योग्य झोप घेणे देखील आवश्यक आहे. ताजे फळे, भाज्या या आपल्या शरीरात उर्जा देतात ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. अगोदर खाल्लेले अन्न पचन झाल्यावरच परत अन्न खावे. कधीही ओव्हरलोडिंग करू नये. याशिवाय आपण सूप, नारळपाणी आणि काकडीचे इत्यादी हलके पर्याय खाऊ शकता. यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती चांगली होते.
किवी कमी कॅलरीज असणारे एक पौष्टिक फळ आहे. किवीमध्ये फोलेट आणि पोटॅशियम देखील आढळतात. किवी खाल्ल्याने पाचन शक्तीत वाढ होते. तसेच शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते. किवीमुळे सेरोटोनिन हार्मोन्स वाढतात. हे हार्मोन्स शांत झोपेसाठी खूप महत्त्वाचे मानले जातात. किवीमध्ये व्हिटॅमिन सी, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत, ज्यामुळे शरीराची जळजळ कमी होते. झोपेची समस्या असलेल्या लोकांना झोपण्यापूर्वी मध्यम आकाराचे 1-2 किवी खाण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.
देशातील बर्याच भागात पांढरे तांदूळ म्हणजेत भाताचा आहारात नियमित समावेश असतो. पांढर्या तांदळामध्ये संतुलित प्रमाणात जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात. तांदूळ हा ग्लाइसेमिक इंडेक्स फूड मानला जातो. असे म्हटले जाते की, उच्च ग्लाइसेमिक इंडेक्सयुक्त अन्न खाल्ल्यास चांगली झोप येते. म्हणूनच, रात्रीच्या आहारात भाताचा समावेश अवश्य करावा. त्याने निद्रानाशची समस्या दूर होण्यास मदत होईल.
संबंधित बातम्या :
Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो
Face Massage | त्वचेसाठी संजीवनी ठरेल ‘फेस मसाज’, वाचा याचे फायदे…
Beauty Tips | चेहऱ्याचे सौंदर्य वाढवतील ‘ही’ योगासने, तुम्हीदेखील नक्की ट्राय करा!#beautytips | #skincare | #yoga | #beauty https://t.co/zqbiogPSVT
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 25, 2021
(Sleep is essential for boosting the immune system)