मुंबई : अनेक लोकांना जेवन झाले की, लगेचच झोपण्याची सवय असते. मात्र, असे करणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. आपणही असे करत असाल तर आपण अनेक आजारांना निमंत्रणच देत आहात जेवल्यानंतर, नाष्टा केल्यानंतर किंवा काहीही खाल्यानंतर झोपणं हे शरीराच्या आरोग्यासाठी हानिकारक मानलं जातं. (Sleeping after a meal is dangerous to health)
-जेवल्यावर तातडीने झोपल्यास पोटात गेलेल्या अन्नाचं योग्य पद्धतीने पचन होत नाही. यामुळे शरीरात एक विशिष्ठ प्रकारचं आम्ल तयार होतं आणि ते छातीत जातं. यामुळे अनेक वेळा आंबट ढेकरही येतात. शिवाय अन्नाचं योग्य पद्धतीने पचन न झाल्यास अनेक आजार जडू शकतात.
-जेवल्या जेवल्या झोपल्याने पचनक्रिया बिघडते. याचा परिणाम रक्तदाब आणि रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं. यामुळे हृदयावर परिणाम होऊन त्यासंबंधीचे आजार बळावू शकतात. त्यामुळे जेवल्यावर तातडीने झोप घेणे धोकेदायक आहे.
-जर आपण जेवल्यानंतर लगेच झोपलात तर, कॅलरीज योग्य पद्धतीने बर्न होत नाहीत. त्यामुळे वजन वाढण्यास मदत होते. आपणं जेवढं खातो त्यापेक्षा जास्त शरीरातील कॅलरीज बर्न करणं गरजेचं असतं. यामुळे शरीराचं कार्य उत्तम राहण्यास मदत होतं.
-जेवण आणि झोपण्यामध्ये किमान एक ते दोन तासांचे अंतर असायला पाहिजे. यामुळे वजन वाढण्याचा धोका कमी होतो, शिवाय आरोग्यालाही फायदेशीर ठरतं. या मधल्या एक-दोन तासांमध्ये पचनप्रक्रिया सुरळीत पूर्ण होते.
-जेवल्यानंतर तातडीने झोपल्यास पित्ताचा त्रास होण्याची शक्यताही आहे. कारण तातडीने झोपल्यास पचनप्रक्रियेत अडथळे निर्माण होतात आणि परिणामी पित्त वाढते.
संबंधित बातम्या :
Jamun Seeds | मधुमेहाच्या रुग्णांसाठी संजीवनी ठरतील जांभळाच्या बिया, ‘या’ समस्यांवरही उपयोगी!
शिळा भात खाणे टाळताय? मग ‘हे’ वाचा !https://t.co/vYYFI9ZMFK #Rice | #Health | #healthcare | #Food | #lifestyle
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 28, 2021
(Sleeping after a meal is dangerous to health)