मेकअप वापरताना ‘या’ मूलभूत गोष्टी लक्षात ठेवा, सौंदर्याला लागतील चार चांद!

| Updated on: May 14, 2021 | 11:44 AM

मेकअप करायला महिलांना फार आवडते. मेकअप केल्याने स्टायलिश आणि ग्लॅमरस लूक दिसतो.

मेकअप वापरताना या मूलभूत गोष्टी लक्षात ठेवा, सौंदर्याला लागतील चार चांद!
मेकअप
Follow us on

मुंबई : मेकअप करायला महिलांना फार आवडते. मेकअप केल्याने स्टायलिश आणि ग्लॅमरस लूक दिसतो. मात्र, उन्हाळ्यात मेकअप करताना विशेष काळजी घ्यावी लागते. कारण त्वचेवरील घाम आणि तेलकटपणामुळे मेकअप खराब होण्याची भीती असते. आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्यात मेकअप कसा करावा यासाठी खास टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे मेकअप केल्यानंतर आपली त्वचा अधिक चांगली दिसेल. (Special tips for facial makeup)

1. कुढल्याही मेकअप करण्याच्या अगोदर आपला चेहरा पाण्याने स्वच्छ धुणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण फेसवॉशचा वापर केला पाहिजे.

2. चेहऱ्याचे डाग लपविण्यासाठी सर्वप्रथम त्वचेवर कंसीलर वापरा. यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग दिसणार नाहीत. परंतु शक्यतो उन्हाळ्यात फाउंडेशन वापरू नका कारण यामुळे आपला चेहरा खूपच वेगळा दिसतो.

3. कंसीलरनंतर कॉम्पॅक्ट लावले पाहिजे.  केवळ कॉम्पॅक्ट स्किन टोन वापरा, अन्यथा चेहरा आणि शरीराच्या इतर भागाच्या रंगात फरक जाणवेल. उन्हाळ्यात हलका मेकअप चांगला दिसतो, म्हणून कॉम्पॅक्टचे दोन कोट्स पुरेसे असतात.

4. सर्वप्रथम, डोळ्यांखाली कॉम्पॅक्ट लावा जेणेकरून त्वचा स्पष्ट दिसेल. यानंतर लाइनर आणि मस्करा लावा. शेवटी मस्करा लावला पाहिजे. मस्करा लावल्याने आपला चेहरा उठून दिसतो.

5. मेकअप करताना सर्वात शेवटी लिपस्टिक लावली पाहिजे. लिपस्टिकचा रंग चांगला निवडा, मॅटी लिपस्टिक वापरलेली चांगली असते. उन्हाळ्यात शक्यतो पिंक शेड्स वापरू नका.

6. अनेकदा आपण प्रायमरच्या निवडीमध्ये चुका करतो. आजकाल बाजारात बर्‍याच प्रकारचे प्रायमर विकले जातात. परंतु, माहितीअभावी बर्‍याच वेळा आपल्याला चुकीचा प्रायमर मिळतो, ज्यामुळे चेहऱ्याला काही फायदा होत नाही.

प्रायमरनंतर लगेचच फाउंडेशन लावू नका
प्रायमर आपल्या चेहऱ्यावर मेकअपसाठी बेस तयार करतो, याच्या थराला त्वचेवर सेट होण्यास थोडा वेळ लागतो. म्हणून प्रायमर लावल्यानंतर काही काळ चेहऱ्यावर काहीही लावू नका. परंतु, बहुतेक स्त्रिया अशी चूक करतात की, त्या प्रायमरनंतर ताबडतोब चेहऱ्यावर फाउंडेशन लावतात. जर, आपण प्रायमर नंतर लगेचच फाउंडेशन लावले, तर प्रायमर लावण्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणून पुढच्या वेळी प्रायमर अप्लाय करताना काही मिनिटांच्या नंतरच फाउंडेशन अप्लाय करा. या दरम्यानचा वेळ आपण आपले दागदागिने घालण्यासाठी किंवा केशरचना बनवण्यासाठी वापरू शकता.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Health Tips | मासिक पाळीच्या वेदनेत आराम मिळवून देतील ‘हे’ पदार्थ! अशा प्रकारे करा सेवन

HEALTH | ‘कोरोना’च्या धसक्याने जीवनशैलीत चांगले बदल, पावसाळी आजारांत 50% घट!

(Special tips for facial makeup)