उन्हाळ्यात केस सुंदर आणि मुलायम ठेवण्यासाठी ‘या’ खास टिप्स फाॅलो करा 

| Updated on: Apr 19, 2021 | 11:32 AM

उन्हाळ्याची सुरूवात आता झाली आहे. उन्हाळ्यात आपल्या त्वचेची आणि केसांची विशेष काळजी घ्यावी लागते.

उन्हाळ्यात केस सुंदर आणि मुलायम ठेवण्यासाठी या खास टिप्स फाॅलो करा 
2 ते 3 चमचे बेकिंग सोडा घेऊन, त्यामध्ये थोडे पाणी मिक्स करुन पेस्ट तयार करा. ही पेस्ट डोक्याला लावून 10 ते 15 मिनिटांनी केस धुवून टाका. बेकिंग सोड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अँटी-बॅक्टेरिअल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात. त्यामुळे केसांच्या समस्या कमी होतात.
Follow us on

मुंबई : उन्हाळ्याची सुरूवात आता झाली आहे. उन्हाळ्यात आपल्या त्वचेची आणि केसांची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण तापमानात वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे घाम आल्यामुळे आपले केस चिकड आणि तेलकट होतात. यामुळे केसांची काळजी घ्यावी लागते. उन्हाळ्या म्हटंल्यावर आपण त्वचेकडे जास्त लक्ष देतो आणि केसांकडे दुर्लक्ष करतो. यामुळे उन्हाळ्यात आपले केस खराब होतात. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, उन्हाळ्यात आपल्या केसांची काळजी कशी घेतली पाहिजे. (Special tips for hair care in summer)

-उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण जेव्हा घराबाहेर पडतो. त्यावेळी शक्यतो केसांच्या संरक्षणासाठी टोपी किंवा स्कार्फ घ्यावा म्हणजे आपले केस झाकूण राहतील.

-हेअर स्ट्रेटनर किंवा कर्लरचा वापर टाळण्याचा प्रयत्न करा. कारण यामुळे उन्हाळ्यात आपले केस खराब होण्याची अधिक शक्यता असते.

-केसांची लांबी वाढविण्यासाठी आपण रात्री नारळ तेलाने मेथी दाणे शिजवू ठेवा. त्यानंतर सकाळी उठून मेथी दाणे आणि तेल वेगळे करा आणि त्या तेलाने केसांच्या मुळांमध्ये मसाज करा. आठवड्यातून किमान 2 वेळा हे तेल लावावे. एका महिन्यात तुम्हाला फरक दिसेल.

-डोक्यातील कोंडापासून मुक्त होण्यासाठी, मेथी तेल व गोक्षुर समान प्रमाणात घेऊन त्याची पेस्ट बनवा. नंतर या पेस्टमध्ये तेल आणि मध मिसळ. ही पेस्ट हेअर मास्क म्हणून लावा. किमान एक तास तरी हा मास्क राहू द्या, नंतर शॅम्पूने केस धुवा

-कोरफड आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध आहे. हे केवळ आपल्या त्वचेची काळजी घेत नाही, तर आपल्या केसांसाठीही फायदेशीर ठरतात. यामुळे आपले केस चमकदार होतात. कोरफडयुक्त हेअर कंडिशनर बनवण्यासाठी, प्रथम कोरफडच्या पानांतून गर काढा. आता एक चमचे लिंबाचा रस, 4 चमचे कोरफड जेलमध्ये घाला. आता हे मिश्रण आपल्या केसांवर लावा आणि सुमारे 10 मिनिटे आपल्या केसांवर तसेच राहू द्या. 10 मिनिटांनंतर कोमट पाण्याने आपले केस स्वच्छ करा.

संबंधित बातम्या : 

Food | ‘या’ पदार्थांना दूर ठेवा आणि हिवाळ्याच्या काळात सर्दी-खोकल्यापासून सुरक्षित राहा!

(Special tips for hair care in summer)