मुंबई : जर आपल्या कामाचे स्वरूप असे असेल की, ज्यामुळे आपल्याला बराच काळ घराबाहेर किंवा कामाच्या ठिकाणी थांबावे लागत असेल, तर आपण आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. बराच काळ घराबाहेर राहण्याने आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतो. प्रत्येक व्यक्तीला निरोगी आणि तंदुस्त राहण्यासाठी आवडते. स्वत: ला निरोगी ठेवणे इतके अवघड नाही. तुमच्या स्वयंपाकघरात अशा काही गोष्टी आहेत. ज्याचा आहारात समावेश करून तुम्ही निरोगी राहू शकतात. (Special tips for staying fit and healthy)
दही
दह्यामध्ये अनेक पोषक घटक असतात. दररोज दही खाल्ल्याने केवळ ताजेतवाने वाटत नाही तर, पाचन तंत्रही ठीक राहते आणि पोटाचा त्रासही होत नाही. दही ऑस्टिओपोरोसिस, रक्तदाब, केस आणि हाडे यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. दह्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, राइबोफ्लेविन, व्हिटामिन बी 6 आणि व्हिटामिन बी12 या पोषक घटकांचे प्रमाण अधिक असते. जेवणात रोज दही खाणे आवश्यक आहे. दही खाल्ल्यामुळे शरीरातील समस्या दूर व्हायला मोठी मदत होते.
दाल
आपल्या घरात असलेल्या रंगीबेरंगी डाळ पौष्टिकतेने भरलेल्या असतात. डाळीत फायबर आणि प्रथिने मोठ्या प्रमाणाच असतात. ही दोन्ही पोषक तंत्रे आपल्या पाचन तंत्राला निरोगी ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. यामुळे नवीन पेशी देखील पुन्हा निर्माण होतात. याशिवाय डाळींमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील असतात. जसे व्हिटॅमिन ए, बी, सी, ई, मॅग्नेशियम, लोह आणि जस्त असतात.
बाजरी
दैनंदिन जीवनात आपण बहुतेक तांदूळ आणि गहू खातो. ग्लूटेन मुक्त धान्य आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्याऐवजी आपण नाचणी आणि बाजरीचेही सेवन करू शकता. ते खाल्ल्याने तुम्हाला अधिक पोषण मिळते. खायलाही खूप चवदार आहे. त्यात फायबर असते. यामुळे बद्धकोष्ठता होत नाही. पोटाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो. हे वजन कमी करण्यास देखील मदत करते.
मसाले
भारत मसाल्यांसाठी जगभरात प्रसिद्ध आहे, कारण या मसाल्यांमध्ये औषधी गुणधर्मही असतात. या मसाल्यांमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-बॅक्टेरियल, अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत. ते रोगांपासून संरक्षण करण्यात मदत करतात. तसेच तुमची प्रतिकारशक्ती वाढवते. हळद, दालचिनी, मेथी दाणे, मिरपूड नक्कीच खायला हवी. हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
लसूण
आपल्या आरोग्यासाठी लसूण खाणे अत्यंत फायदेशीर आहे. कच्चा लसूण खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. जेवण बनवताना त्यात लसूण घातल्यास पदार्थाची चव अनेक पटींनी वाढते. शरीर निरोगी ठेवण्यासाठीही लसूण खूप फायदेशीर मानली जाते. आयुर्वेदात लसूण एक उत्तम औषध म्हणून वापरली जाते. लसूनमध्ये भरपूर प्रमाणात एलिसिन, झिंक, सल्फर, सेलेनियन आणि व्हिटॅमिन ए आणि ई सुद्धा आहेत.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
संबंधित बातम्या :
Skin Care | कोरड्या त्वचेने हैराण? क्रीमही काम करत नसतील, तर वापरा घरगुती ‘उटणं’!#SkinCare | #skincareroutine | #homeremedies | #BeautySecrets https://t.co/2j7jbRm7bJ
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 5, 2021
(Special tips for staying fit and healthy)