रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ‘हे’ काढे नक्की ट्राय करा!

| Updated on: Apr 23, 2021 | 10:52 AM

कोरोना रूग्णांची वाढती संख्या बघता आपल्याला विशेष काळजी घेणे आवश्यक झाले आहे.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हे काढे नक्की ट्राय करा!
सर्दी खोकल्यावर गुणकारी हा स्पेशल देशी चहा
Follow us on

मुंबई : कोरोना रूग्णांची वाढती संख्या बघता आपल्याला विशेष काळजी घेणे आवश्यक झाले आहे. घरात सुरक्षित राहून आपल्या आरोग्याची काळजी प्रत्येकालाच घ्यावी लागणार आहे. कोरोनापासून दूर राहण्यासाठी सर्वात महत्वाचे झाले की, आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे. जर आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर आपल्याला कोरोनाची लागण देखील होणार नाही. (Special tips to boost the immune system)

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला एक खास पेय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होऊ शकते.

-तुळशीची पाने

-दालचिनी

-सुठ,

-आद्रक

-गुळ

-एक ग्लास पाणी

एक ग्लास पाण्यात सर्वात अगोदर तुळसीची पाने घाला आणि गॅसवर ठेवा. त्यानंतर त्यात दालचिनी, आद्रक, गुळ आणि सुठ घाला जवळपास 30 ते 35 मिनिटे हे चांगले उकळू द्या आणि प्या. आपली शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल. दररोज सकाळी आणि संध्याकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन केल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढेल आणि आपण अनेक आजारांपासून दूर राहाल.

सर्वात आधी काढा बनवण्यासाठी काढ्याच्या प्रमाणात एकूण सामुग्रीपटीत चार भाग तुळशीची पानं, दो भाग दालचिनी, दोन भाग सुंठ आणि एक भाग काळे मिरे घ्या. हे सर्व एकत्र वाटून त्याची पावडर बनवा. त्याच्यापासून 3 ग्रॅमची टी-बॅग किंवा 500 मिलिग्रॅम पावडरच्या गोळ्या तयार करा. दिवसातून एक किंवा दोन वेळा याला 150 मिलीलिटर उकळलेल्या पाण्यात घालून चहासारखं प्या.

कच्च्या कांद्याच्या रसानंतर 1/2 तासांनंतर आपण रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी काढा तयार करू शकता. हा काढा तयार करण्यासाठी आपल्याला 1 चमचे जिरे, 4 ते 5 तुळशीची पाने, 4 ते 5 पुदीना पाने, 2-3 काळी मिरी, 1 चमचे मेथी दाणे, 1/4 हळद, 1 लवंगा, 1 वेलची, 1 आवश्यक आहे. / 4 दालचिनी घाला. पाणी उकळवा. नंतर त्यात थेंब लिंबाचा रस घाला. या काढामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हळद अतिशय गुणकारी आहे. हळदीमध्ये अँटीव्हायरल, अँटीफंगल गुण असतात. ज्यामुळे सर्दी, ताप, खोकला यासारख्या विकारावर हळद गुणकारी ठरते. तसेच आजार लवकर बरा होण्यासही मदत मिळते. हृदय निरोगी ठेवण्यासाठीही हळद अतिशय प्रभावी ठरते. हळदीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. यामुळे आपले हृदय निरोगी राहण्यास मदत होते. हळदीचे दूध आपल्या रक्तातील साखरेची पातळी संतुलित करते. ज्यामुळे आपले आरोग्य देखील निरोगी राहते.

(टीप : सेवानापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Food | ‘या’ पदार्थांना दूर ठेवा आणि हिवाळ्याच्या काळात सर्दी-खोकल्यापासून सुरक्षित राहा!

(Special tips to boost the immune system)