मुंबई : कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यामुळे शरीराला मोठा धोका निर्माण होतो. यामुळे हृदयविकाराचाही धोका वाढतो. पण तुम्हाला माहिती आहे का शरीरात कोलेस्टेरॉल असणं देखील महत्वाचं मानलं जातं. कोलेस्ट्रॉल दोन प्रकारचे एचडीएल आहे अर्थात चांगले कोलेस्ट्रॉल, एलडीएल म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरात असता. कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी आपण आहारात असे काही पदार्थ घेतले पाहिजेत. ज्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते. (Special tips to control cholesterol levels in the body)
हे नेमके कोणते पदार्थ आहेत. ज्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते हे आज आपण बघणार आहोत. आपल्या आहारात ओट्स असणं फायदेशीर आहे. ओट्स खाल्ल्याने कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित राहते. यामध्ये ग्लूकोन नावाचा घटक असतो जो आतडे साफ करण्यास मदत करतात. यामुळे आपण आहारात शक्य आहे तितक्या वेळी ओट्स घेतले पाहिजे.
चवीसाठी जेवणामध्ये कांदा वापरला जातो. पण त्याचे अनेक आरोग्यादायी फायदेही आहेत. लाल कांद्या खाल्ल्याने कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित केली जाऊ शकते. यामुळे आपल्या आहारात कांद्याचा जास्तीत-जास्त समावेश करा. अॅवकाडो हे फळ आरोग्यासाठी चांगले आणि एक पौष्टिक फळांपैकी आहे, ज्यामध्ये सर्व प्रकारचे महत्त्वपूर्ण जीवनसत्त्वे आहेत. या फळामुळे पचन सुधारते, वजन कमी करण्यास मदत होते. विशेष म्हणजे यामुळे आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.
हे फळ सलादमध्ये जास्त करून वापरले जाते. अॅवकाडो फळ सर्वात अगोदर कापुन घ्या त्यानंतर त्यात थोडेसे ऑलिव्ह तेल, मीठ, मिरचीपूड आणि जिरेपूड घाला आणि खा…अशाप्रकारे हे फळ दररोज खाऊन तुम्ही तुमच्या दिवसाची सुरूवात करू शकता. मेटॅबोलिक सिंड्रोम अॅवकाडोमुळे कमी होतो. अॅवकाडो सेवन करणाऱ्यांना ई जीवनसत्त्व, तांबे, मॅग्नेशियम, क जीवनसत्त्व, फोलेट मिळतात.
संबंधित बातम्या :
चपाती खाल्यानंतर ‘ही’ चूक अजिबात करु नका, आरोग्यास होऊ शकतं नुकसानhttps://t.co/YhmdUa5Ut6 #HealthTips | #Health | #Lifestyle | #Tv9Marathi
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 31, 2020
(Special tips to control cholesterol levels in the body)