मुंबई : प्रदूषणाचा सरळ परिणाम आपल्या त्वचेवर होतो. यामुळे चेहऱ्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. अनेक आैषधे घेऊन सुध्दा त्वचेचा समस्या दूर होत नाहीत. त्यामध्ये अनेक जणांना चेहऱ्यावरील मुरुमाची मोठी समस्या असते. अनेक आैषधे घरगुती उपाय देखील करून त्यांच्या चेहऱ्यावरचा मुरुम जात नाही. नुसते आैषधे घेऊन हा मुरुम जात नाही तर यासाठी काही घरगुती उपाय करावे लागते. आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे घरगुती उपाय करून चेहऱ्यावरील मुरूम घालू शकता. (Special tips to get rid of pimples on the face)
-चंदनाची पावडर, हळद आणि गुलाब पाणी घ्या. हे सर्व व्यवस्थित मिक्स करा याची चांगली पेस्ट तयार करा आणि चेहऱ्यावर लावा. साधारण 20 ते 25 मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवा. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. आठवड्यातून तीन ते चार वेळा अशाप्रकारे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील मुरूमाची समस्या दूर होण्यास नक्की मदत होईल.
-मध आपल्या आरोग्यासाठी तसेच त्वचेसाठीही फायदेशीर आहे. मधात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि अँटीइन्फ्लेमेटरी असते. ज्यामुळे मुरुम कमी होण्यास मदत होते. मुरुमावर एक-दोन थेंब मध लावा आणि रात्रभर तसेच ठेवा आणि सकाळी पाण्याने चेहरा धुवा.
-आहारात जास्त तेलकट पदार्थांचा समावेश केला तर चेहऱ्यावरील मुरुमाची समस्या निर्माण होऊ शकते. यामुळे आहारात शक्यतो तेलकट पदार्थ घेणे टाळाच
-आरोग्याच्या दृष्टीने कोरफडाची पाने ही नैसर्गिकरित्या प्रभावशाली आयुर्वेदीक वनस्पती आहे. चेहऱ्यावरील मुरुमामुळे तुम्ही त्रस्त असाल तर कोरफडचा रस आपल्या चेहऱ्याला लावा आणि 20 ते 30 मिनिटे तसेच ठेवा.
-केळी अगोदर चांगली मॅश करा नंतर दोन चमचे दही आणि एक चमचा मध घालून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहर्यावर लावा आणि 15-20 मिनिटे ठेवा आणि त्यानंतर साध्या पाण्याने चेहरा धुवा. हे सतत केले तर आपल्या चेहऱ्यावरील मुरुम नाहीसे होतील.
-कच्चा मध हा मुरुमासाठी एक नैसर्गिक पर्याय आहे. यामध्ये बॅक्टेरिया नष्ट आणि प्रतिबंधित करण्याचे गुणधर्म आहेत. मुरुमावर रात्रभर थोडा शुद्ध मध लावा. तसेच तो पाण्यात मिसळून आपण क्लीन्झर म्हणून देखील वापर करू शकता.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
संबंधित बातम्या :
Skin Care | कोरड्या त्वचेने हैराण? क्रीमही काम करत नसतील, तर वापरा घरगुती ‘उटणं’!#SkinCare | #skincareroutine | #homeremedies | #BeautySecrets https://t.co/2j7jbRm7bJ
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 5, 2021
(Special tips to get rid of pimples on the face)