चेहऱ्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

| Updated on: May 05, 2021 | 10:04 AM

चेहऱ्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी अनेक प्रकारची उत्पादने वापरली जातात.

चेहऱ्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की ट्राय करा!
Follow us on

मुंबई : चेहऱ्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी अनेक प्रकारची उत्पादने वापरली जातात. बदलती जीवनशैली, अयोग्य आहार आणि प्रदूषणाचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येतो. या सर्व गोष्टींमुळे आपल्या चेहऱ्यावर काळे डाग पडतात. हे डार्क स्पॉट्स अर्थात काळे डाग काढून टाकण्यासाठी बर्‍याच प्रकारची उत्पादने बाजारात आहेत. परंतु, ही उत्पादने किती प्रभावी आहेत, हे आपल्या त्वचेच्या प्रकारावर अवलंबून असते. मात्र, आपण घरगुती उपाय करून आपल्या चेहऱ्यावरील काळे डाग दूर करू शकतो. (Special tips to remove dark spots on the face)

लिंबाचा रस
लिंबूमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. जे काळे डाग कमी करण्यास मदत करते. चेहऱ्यावरील काळे डाग मुक्त करण्यासाठी चेहऱ्यावर लिंबू लावा आणि काही सेकंद तसेच सोडा. मग पाण्याने चेहरा धुवून घ्या. हा उपाय दररोज करा यामुळे आपल्या चेहऱ्यावरील काळे डाग गायब होतील.

कोरफड जेल
जर आपल्याला चेहऱ्यावरील काळे डाग दूर करायचे असतील कोरफड जेल लावा. कोरफडच्या जेलमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत जे त्वचेचे डाग वेगाने कमी करतात. आपण ते थेट कोरफडचा गर काढून देखील आपल्या चेहऱ्याला लावू शकतो. या व्यतिरिक्त कोरफडचे जेल देखील बाजारात उपलब्ध आहे.

टोमॅटो
चेहर्‍यावरील काळे डाग दूर करण्यासाठी टोमॅटोइतका चांगला दुसरा घटक नाही. टोमॅटो लाइकोपीनने समृद्ध असतो, जो त्वचेसाठी सनस्क्रीन प्रमाणे काम करतो. यासाठी एका भांड्यात टोमॅटोचा कुस्कुरून त्यात लिंबाचा रस मिसळा. या पेस्टने चेहऱ्यावर गोलाकार मोशनमध्ये मसाज करा.

पपई
पपई हे एक नैसर्गिक एक्सफोलीएट आहे जे अँटी-एजिंगचे काम करते. एक्सफोलीएटिंग प्रक्रिया आपली मृत त्वचा काढून टाकते आणि त्वचेला आतून निरोगी बनवते. एक्सफोलिएशनसाठी कच्चा पपई एका भांड्यात स्मॅश करून घ्या आणि हा कुस्करलेला गर चेहऱ्यावर मास्क म्हणून लावा. हा पपईचा फेस मास्क वाळवल्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा.

टीप : वरील माहिती ही सामान्य माहितीवर आधारित आहे. आपण सौंदर्यतज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.)

संबंधित बातम्या : 

Skin Care Tips | लग्न करताय? ना ब्यूटी पार्लर, ना ट्रिटमेंट, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा ग्लो!

(Special tips to remove dark spots on the face)