नवी दिल्ली- डिसेंबर- जानेवारीच्या महिन्यात कडाक्याची थंडी पडते. कडाक्याच्या थंडीतून बचावासाठी सूर्यकिरणे हवीहवीशी वाटतात. केवळ उन्हामुळे शरीराला उष्णता प्राप्त होत नाही. तर मानवी शरीराला आवश्यक जीवनसत्वे सूर्यकिरणांतून मिळतात. तज्ज्ञांच्या मतानूसार उन्हाचे एकाधिक फायदे आहेत. विविध प्रकारच्या आजारांवर थेट फायदा प्राप्त होतो. त्यामुळे थंडीच्या दिवसांत कोवळ्या सूर्यकिरणांचे लाभ जाणून घ्या-
1. जीवनसत्व-डी
सूर्यकिरणांपासून शरीराला मोठ्या प्रमाणात डी- जीवनसत्त्वाचा पुरवठा होतो. हाडांच्या मजबूतीसाठी डी-जीवनसत्वाची आवश्यकता असते. सांधेदुखी तसेच कडाक्याच्या थंडीमध्ये उद्भवणारे हाडांसंबंधी विकार टाळण्यासाठी जीवनसत्व-डी उपायकारक ठरतात.
2. निद्रेवर उपाय
सूर्यकिरणांमुळे शरीरात मेलाटोनिन संप्रेरकाची निर्मिती होते. या हार्मोनमुळे परिपूर्ण आणि आरामदायक झोप मिळते. त्यामुळे मानसिक तणाव निवळण्यास मदत होते.
3.वजन घटीसाठी हितकारक
वजन घटविण्यासाठी कोलेस्ट्रॉल घटविणे अत्यंत महत्वपूर्ण आहे. सूर्यकिरणे वजन घटविण्यासाठी उपायकारक ठरतात. हिवाळ्यात सूर्यकिरणांमध्ये 15 मिनिटे बसणे अत्यंत फलदायी ठरते.
4.जीवाणू संसर्ग
शरीराला कोणत्याही प्रकारे जीवाणू संसर्ग झाल्यास तुम्हाला सूर्यकिरणे उपयुक्त ठरतील. उन्हात बसल्याने जीवाणूचा संसर्ग तीव्रतेने घटतो. सूर्यकिरणांमुळे त्वचेला तजेलताही प्राप्त होते.
5. पोलिओ विकारावर वरदान
सूर्यकिरणे पोलिओ सारख्या गंभीर विकारांवर उपयुक्त ठरतात. त्यामुळे पोलिओ विकाराने ग्रस्त रुग्णांना सूर्यकिरणे वरदान ठरतात.