मुंबई : देशामध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कोरोनाच्या रूग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच आहे. यासर्व परिस्थितीमध्ये आपण आपल्या आरोग्याची विशेष काळजी ही घेतली पाहिजे. यासाठी चांगला आहार आणि व्यायाम हा सर्वात महत्वाचा आहे. यापेक्षाही महत्वाचे आहे की, चांगली झोप कारण आपली झोप व्यवस्थित असेल तर आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील चांगली आहे. मात्र, बऱ्याच लोकांना झोप न येण्याची समस्या असते. (Take banana tea and boost the immune system)
झोप येण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला एक खास पेय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल. सर्वात अगोदर एका भांड्यात पाणी घ्या आणि ते गरम होऊद्या. त्यानंतर केळीचे साल काढा केळीचे काप करून घ्या आणि पाण्यात टाका. 10-20 मिनिटे उकळी येऊ द्या. त्यानंतर त्यात दालचिनीची पूड घाला आणि गॅस बंद करा. चहा गाळून घ्या आता केळीचा चहा तयार आहे.
हा चहा पिणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे आपल्याला चांगली झोप लागते आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. केळीमध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियमसारखे खनिजे असतात, जे रक्तदाब कमी करण्यास तसेच स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करतात. याशिवाय केळ्याच्या चहामध्ये कॅटेचिन नावाचा अँटीऑक्सिडेंट असतो जे हृदय निरोगी ठेवतात. केळीमध्ये इलेक्ट्रोलाइट्स आणि खनिजे देखील शरीरात रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.
केळी खाल्ल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते आणि शरीर निरोगी राहते. पचनासाठी केळी चांगली असते. केळीमध्ये उच्च फायबर असते. केळी खाल्ल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते आणि शरीर निरोगी राहते. केळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम असते, जे उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. कॅल्शियमचा दररोजचा डोस केवळ हाडांची घनता टिकवून ठेवण्यासाठी उपयुक्त ठरत नाही तर, त्यांना बळकटी देण्यासही फायदेशीर ठरू शकतो. केळीमध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, मॅंगनीज, मॅग्नेशियम, लोह, फोलेट, नियासिन, राइबोफ्लेविन आणि बी 6 सारखी जीवनसत्त्वे असतात.
संबंधित बातम्या :
Immunity Booster | थंडीच्या दिवसांत आवळ्याचा रस आरोग्यवर्धक, इम्युनिटी वाढवण्यासाठी ‘हे’ नक्की ट्राय करा!https://t.co/XPmKiIDsHE#ImmunityBooster #AmlaJuice
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 28, 2020
(Take banana tea and boost the immune system)