Night Skin care : रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याची ‘या’ पध्दतीने काळजी घ्या…

| Updated on: Mar 07, 2021 | 3:53 PM

लोक त्वचा निरोगी ठेवण्यासाठी नेहमी विविध उपाय ट्राय करतात.

Night Skin care : रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याची या पध्दतीने काळजी घ्या...
चमकदार त्वचा
Follow us on

मुंबई : लोक त्वचा निरोगी ठेवण्यासाठी नेहमी विविध उपाय ट्राय करतात. निरोगी आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी, विविध सौंदर्य उत्पादनांचा वापर करतात. परंतु, आपणास माहित आहे का की, या महागड्या उत्पादनांऐवजी काही चांगल्या सवयींचा अवलंब करून देखील आपण निरोगी त्वचा मिळवू शकता. या सवयींचा अवलंब केल्याने त्वचा सुधारण्यास सुरुवात होते. (Take care of your face like this before going to bed at night)

-रात्री झोपण्याच्या अगोदर चेहरा क्लींज करा. त्यामुळे त्वचेतील घाण आणि बॅक्टेरिया साफ होईल. चेहऱ्यावरील घाण आणि तेलाचा थरही स्वच्छ होऊन जाईल.

-रोज संध्याकाळी आपला चेहरा फेस वॉशने धुवा. यानंतर, रात्री झोपण्याच्या अगोदर चेहरा स्किनकेयरने स्वच्छ करा आणि दररोज हे केल्याने तुमची त्वचा चांगली होईल.

-स्किनकेयरने त्वचा स्वच्छ केल्यानंतर मॉइश्चरायझर चेहऱ्यावर लावा. आपण मॉइश्चरायझर न वापरल्यास चेहऱ्याचा ओलावा हळूहळू कमी होईल. ज्यामुळे आपली त्वचा निर्जीव आणि थकलेली दिसू शकते.

-प्रत्येक व्यक्तीने दिवसातून कमीतकमी एक लिटर पाणी पिणे गरजेचे आहे. यासाठी दर तासाला दोन ग्लास पाणी पिण्याचा प्रयत्न करा. या प्रमाणे दिवसातून किमान 24 ग्लास पाणी पिण्याचा प्रयत्न करा. यामुळे आपली त्वचा आणि आरोग्य चांगले होईल.

-नेहमी आंघोळीनंतर स्वच्छ आणि कोरडे टॉवेल्स वापरायला हवेत. गलिच्छ किंवा अस्वच्छ टॉवेल्सच्या वापरामुळे पुरळ, फंगल इन्फेक्शन आणि खाज सुटण्याची समस्या उद्भवू शकते. म्हणून त्वचा नेहमीच निरोगी ठेवण्यासाठी स्वच्छ टॉवेल्सचा वापर केला पाहिजे.

(टीप : कोणत्याही उपचारापूर्वी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

(Take care of your face like this before going to bed at night)