स्मार्ट गृहिणींना ‘हे’ 10 किचन हॅक्स माहिती असायलाच हवेत, कारण…

| Updated on: Jan 12, 2024 | 1:02 PM

kitchen hacks : प्रत्येक स्मार्ट गृहिणींना 'हे' 10 किचन हॅक्स माहिती असायलाच हवेत; जाणून घ्या कोणते आहेत 10 किचन हॅक्स... या 10 किचन हॅक्समुळे तुम्हाला होईल मोठा फायदा... घरातली कामं देखील होतील लवकर...

स्मार्ट गृहिणींना हे 10 किचन हॅक्स माहिती असायलाच हवेत, कारण...
Follow us on

मुंबई | 12 जानेवारी 2024 : घर सांभाळलं बाहेर नोकरी किंवा व्यवसाय करण्यापेक्षा देखील फार कठीण आहे. घरातील कामं करण्यात आणि घरातील माणसांची काळजी घेण्यात पूर्ण दिवस कसा निघून जातो… हे देखील गृहिणींना कळत नाही. घराची काळजी घेण्यात व्यस्त असलेल्या महिलांना स्वतःसाठी वेळ देखील मिळत नाही. अशात किचनमध्ये काम करत असताना अनेक अडथळे येतात. एवढंच नाही तर, अनेक गोष्टींची काळजी देखील घ्यावी लागते. कुटुंबियांसाठी स्वयंपाक करत असताना महिलांना अनेक गोष्टींकडे लक्ष द्याव लागतं… त्यामुळे आज असे काही किचन हॅक्स जाणून घेऊ ज्याचा फायदा गृहिणींनी होईल…

स्वयंपाक घरातील कामं सोपे करणारे हॅक्स… (Kitchen hacks for housewife)

– बारिक केलेले मसाले मंद आचेवर शिजवून घ्या. ज्यामुळे पदार्थाला चव आणि रंग फार चांगला येईल…

– भाजी बनण्यासाठी अधिक वेळ होत असेल तर, टोमॅटो टाकल्यानंतर मिठ घाला, ज्यामुळे कांदा आणि टोमॅटो शिजण्यास मदत होईल.

हे सुद्धा वाचा

– ग्रेव्ही घट्ट करण्यासाठी भाजलेले बेसन वापरा. ग्रेव्हीमध्ये पिठीसाखर घातल्यास त्याची चव वाढते. चवीनुसार पिठी साखर पदार्थामध्ये घातल्यास चव चांगली येईल.

– जर तुमच्या घरात टोमॅटो नसेल तर हा हॅक तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. स्पयंपाक घरात असलेले टोमॅटो संपले की ग्रेव्हीमध्ये टोमॅटो केचप किंवा सॉस वापरू शकता.

– खीर बनवण्यासाठी पातळ भांडी वापरू नका. पातळ भांडी वापरल्यामुळे खीर तळाला चिकटू लागते आणि खीरची चव खराब होते. म्हणून खीर बनवण्यासाठी जाड तळ असलेली भांडी वापरा.

– जर तुम्ही मसाल्यात दही घालण्याचा विचार करत असाल तर दही चांगल्या प्रकारे फेटून घ्या. महत्त्वाचं म्हणजे दही ढवळत असताना हळूहळू दही मसाल्यात घाला.

– भाज्या कापण्यासाठी नेहमी लाकडी चॉपिंग बोर्ड वापरा. संगमरवरी स्लॅबवर भाजी कापल्याने चाकूची धार कमी होते ज्यामुळे आपलं काम वाढतं.

– घरी तयार असलेले आले, लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट जास्त काळ टिकून ठेवण्यासाठी त्यात 1 चमचा गरम तेल आणि मीठ मिक्स करा.

– घरी तयार असलेलं जेवण सतत गरम करुन खाऊ नका. असं केल्यास जेवणात असलेले पोषक तत्व कमी होतात. शिळे पदार्थ खाणं आरोग्यास हाणीकारक ठरु शकतं.

– फुगलेल्या पोळ्या बनवण्यासाठी पीठ मळून घेतल्यानंतर काही वेळ झाकून ठेवा. असे केल्याने पीठ चांगल्या प्रकारे तयार होतो आणि फुगलेल्या पोळ्या लवकर तयार होतात.