या रंगाची लघवी होते…मग सावधान, तुम्हाला हा आजार असण्याची शक्यता

| Updated on: Feb 22, 2022 | 6:45 PM

तुम्हाला आठवतं, डॉक्टरांकडे गेल्यावरही ते तुम्हाला विचारतात लघवीचा रंग कसा आहे. कधी कधी तर ते तुम्हाला लघवीची चाचणी करायला पण सांगतात. या लघवीच्या रंगातून आपल्याला आजार कळतो. तज्ज्ञांच्या मते लघवीचा रंग साधारण पिवळा असावा.

या रंगाची लघवी होते...मग सावधान, तुम्हाला हा आजार असण्याची शक्यता
Urine
Follow us on

मुंबई : काय तुमचा (Urine)लघवीचा रंग बदलला आहे, तर वेळीच सावध व्हा. डॉक्टरांना यासंदर्भात माहिती द्या. आणि आपल्या आजाराबद्दल जाणून घ्या. रंगात काय ठेवलं आहे असं आपण म्हणतो. पण (Body) शरीरातील होणाऱ्या बदलेला बद्दल आपण कायम जागृत राहिला पाहिजे. आपण यापूर्वी पाहिलं डोळाचा रंग आपल्याला आजाराविषयी संकेत देतो. तसंच (The color of the urine) लघवीचा रंग बदलला तर हे सुद्धा आजाराचं लक्षण आहे. तुम्हाला आठवतं, डॉक्टरांकडे गेल्यावरही ते तुम्हाला विचारतात लघवीचा रंग कसा आहे. कधी कधी तर ते तुम्हाला लघवीची चाचणी करायला पण सांगतात. या लघवीच्या रंगातून आपल्याला आजार कळतो. तज्ज्ञांच्या मते लघवीचा रंग साधारण पिवळा असावा. परदेशात यासंदर्भात अनेक संशोधन आणि शोधनिबंध लिहण्यात आले आहेत.

त्यानुसार लघवीचा रंग, वास आणि वारंवार लघवीला जाणं, या गोष्टीवरुन तुमच्या आजाराचे संकेत मिळतात. तुम्ही कधी तुमच्या लघवीकडे लक्षकेंद्रित केलं आहे का? मग आज करा आणि आम्ही तुम्हाला सांगणार आहे कुठल्या रंगाची लघवी म्हणजे कुठला आजार.

  1. पाण्यासारखी लघवी – तुमच्या लघवीचा रंग हलका पिवळा किंवा पाण्यासारखा असेल. तर चिंता करण्याची गरज नाही.
  2. पिवळी लघवी – याचा अर्थ तुम्ही खूप कमी पाणी पित आहात. शरीरात पाण्याची कमी असं या रंगाचं संकेत असतं
  3. गदड पिवळी लघवी – अशा रंगाची लघवी होत असेल तर तुम्हाल लिव्हरचा त्रास असू शकतो. आणि ही चिंतेची बाब असून त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.
  4. पांढरी दुधाळी लघवी – म्हणजे तुम्हाला किडनी स्टोनचा प्रॉब्लेम असू शकतो. किंवा तुमचा शरीरात इन्फेक्शन झाल्याची शक्यता आहे.
  5. लाल रंगाची लघवी – ही धोक्याची घंटा आहे. रक्ताचा कण लघवीत आल्यामुळे लाल रंगाची लघवी होते. म्हणून त्वरित डॉक्टरांचा दाखवावं.
  6. गुलाबी रंगाची लघवी – गाजर किंवा बीट यांचं सेवन अधिक केल्यास अशा रंगाची लघवी होऊ शकते. मात्र तरीही डॉक्टरांना याबद्दल सांगा.  कारण हे ट्यूमरचे लक्षणं पण असू शकतं. मोठे मोठे आजार लघवी चाचणीद्वारे आपल्याला कळतात. मधुमेह, किडनी आणि मेटाबॉलिज्म सारखे आजार कळतात. तुम्ही दिवसातून किती वेळा लघवीला जाता यावरुनही तुम्हाला कुठला आजार नाही ना हे कळतं. ही लघवीला दिवसातून 4 ते 8 वेळा आणि रात्री एखाद्या वेळी जाणं सामान्य आहे
  7.  तीव्र वास – लघवीचा वास हा उग्र असतो. मात्र तो अधिक तीव्र येत असेल तर तुम्हाला एखाद्या आजाराने ग्रासलं असल्याचं ते लक्षण आहे. त्यामुळे लघवी जाताना कायम लक्ष द्या. त्याकडे दुर्लक्ष करु नका.

टीप : या बातमीतील आरोग्यविषयक सल्ला प्राथमिक माहितीच्या आधारावर आहे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्यावा.

संबंधित बातम्या :

काय तुमची मासिक पाळी अजून आली नाही…मग ही धोक्याची घंटा

Iron : रक्तातील लोहाची कमतरता दूर करण्यासाठी आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश करा

तुम्हीही फ्रिजमधील पदार्थ खात असाल तर वेळीच सावध व्हा… समोर आले गंभीर परिणाम