हिवाळा सुरू झाला असून सगळीकडेच थंडी पडायला सुरुवात झाली आहे. थंडी पासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे वापरले जातात. हिवाळ्यामध्ये थंडीपासून वाचण्यासाठी थर्मल वेअर नक्कीच घेतले जाते. थर्मल वेअर शरीराची उष्णता आत ठेवते आणि बाहेरून येणारी थंड हवा रोखते. इतर जाड कपड्यांच्या तुलनेत थर्मल वेअर हलके आणि परिधान करण्यास अत्यंत सोपे आहे. थर्मल वेअर मध्ये वापरलेले कपडे जसे की लोकर, कापूस आणि पॉलिस्टर चे मिश्रण शरीराला घाम येण्यापासून थांबवते. थर्मल वेअर कपड्यांच्या आतून घातले जाते ज्यामुळे थंडीपासून बचाव करण्यासाठी हे फायदेशीर ठरते. तुम्हालाही थंडीपासून स्वतःचे रक्षण करायचे असेल तर तुम्ही तुमच्याकडे एक चांगल्या दर्जाचे थर्मल वेअर नक्कीच घेऊ शकता. जर तुम्ही थर्मल वेअर खरेदी करणारा असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे ज्यामुळे थंडीपासून तुमचं रक्षण होईल.
कापड योग्य तपासा
जर तुम्ही अतिशय थंड भागात राहत असाल तर मिश्रित लोकर थर्मल वेअर वापरणे योग्य राहील हे अधिक उदारपणा देतात. कापूस असलेले थर्मल वेअर हे कमी थंडी असलेल्या भागासाठी फायदेशीर ठरतात. पॉलिस्टर आणि स्पॅन्डेक्स मिश्रित थर्मल वेअर लवचिक असतात आणि ते ओलावा शोषण्यास मदत करतात.
योग्य माप निवडा
थर्मल वेअर विकत घेताना त्याचे माप योग्य असावे. ते खूप घट्ट किंवा सैल नसावेत. खूप घट्ट थर्मल वेअर घातल्याने रक्ताभिसरण व्यवस्थित होणार नाही तर सैल थर्मल वेअर घातल्यास ते शरीर उबदार ठेवू शकत नाही.
वजन आणि जाडी लक्षात ठेवा
बऱ्याच लोकांना असे वाटते की थर्मल वेअर हे जाड असले तरच त्याचा फायदा होतो. पण थर्मल वेअर जाड असल्याने अस्वस्थता वाटू शकते. हलके वजन आणि पातळ थर्मल वेअर घेणे हा एक चांगला पर्याय आहे. कारण ते कपड्यांच्या आत मध्ये सहज घातल्या जाऊ शकते.
अशी घ्या थर्मल वेअरची काळजी
थर्मल वेअर खरेदी केल्यानंतर त्याची काळजी योग्यरीत्या घेणे आवश्यक आहे. थर्मल वेअर धुताना सौम्य डिटर्जंट धुवा. थर्मल वेअर धुण्यासाठी बाजारात वेगवेगळे लिक्विड डिटर्जंट उपलब्ध आहे. थर्मल वेअर धुतल्यानंतर सरळ सूर्यप्रकाशात वाळत घालू नका तर सावलीच्या ठिकाणी त्याला वाळायला ठेवा.