मुंबई : आता आपण सर्वजणच लवकरच 2023 ला बाय बाय करणार आहोत. यंदाचे हे वर्षे अत्यंत खास ठरले आहे. विशेष म्हणजे या वर्षामध्ये लोकांनी आपल्या आरोग्याची विशेष अशी काळजी नक्कीच घेतलीये. 2023 मधील अनेक गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या नक्कीच आहेत. विशेष म्हणजे यंदा लोकांनी आपल्या खाण्यापिण्यासाठी प्रचंड असे लक्ष देखील दिले. नुकताच आता ग्लोबल सर्च इंजिन गुगलने 2023 मध्ये सर्वात जास्त सर्च झालेल्या खाद्यपदार्थांची यादी जाहीर केलीये. यामध्ये अनेक पदार्थांनी बाजी मारल्याचे बघायला मिळतंय.
फक्त विदेशीच पदार्थ नाही तर अस्सल हेल्दी पदार्थ खाण्यावर लोकांचा भर असल्याचे स्पष्ट झालंय. 2023 मध्ये सर्वाधिक गुगलवर सर्च केल्या जाणाऱ्या पदार्थांची यादी पुढे आलीये. या यादीतून प्रामुख्याने हे स्पष्ट झाले की, लोक आरोग्यासाठी फायदेशीर असलेले पदार्थ अधिक खाण्यावर भर देताना दिसत आहेत. खरोखरच लोकांना त्यांच्या आरोग्याची काळजी आहे.
विशेष म्हणजे तुम्हाला हे जाणून धक्का बसेल पण हे खरे आहे की, गुगलवर सर्वाधिक सर्च बाजरी झालीये. अनेकांनी बाजरी खाण्याचे फायदे आणि तोटे जाणून घेण्यावर भर दिला. फक्त फायदे आणि तोटेच नाही तर अनेकांनी थेट बाजरीपासून तयार होणारे खाद्यपदार्थांची रेसिपी देखील जाणून घेतली.
नरेंद्र मोदी यांनी मिलेट्सला थेट ‘श्री अन्न’ म्हटले होते. विशेष म्हणजे हे जाणून तुम्ही हैराण व्हाल की, सर्वात जास्त सर्च केला जाणारा गुगलवरील दुसरा खाद्यपदार्थ हा चक्क एवोकॅडो ठरला आहे. एवोकॅडो हे अमेरिकेमधील फळ आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या फळाची मागणी भारतामध्ये मोठ्या प्रमाणात केली जात आहे.
इतकेच नाही तर जवळपास सर्वजण या फळाचा आपल्या आहारात समावेश करण्यावर भर देत आहेत. एवोकॅडो हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असणारे फळ आहे. या फळामध्ये अनेक व्हिटामिन आहेत. विशेष: जिम करणारे लोक हे फळ खातात. काश्मीरी डिश मटन रोगन जोश ही देखील सर्वाधिक तिसऱ्या क्रमांकावर सर्च होणारा खाद्यपदार्थ आहे. काश्मीरी डिश मटनसोबतच काठी रोल्स हा पदार्थ देखील सर्वाधिक सर्च केलेला चाैथा खाद्यपदार्थ आहे.