मुंबई : कोरोनाची दुसरी लाट संपूर्ण देशामध्ये आली आहे. ज्यालोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे, त्यांना कोरोनाची लागण लागत आहे. सध्याच्या परिस्थितीत, रोगप्रतिकारक शक्ती बळकट करण्याचा सल्ला डॉक्टर आणि तज्ज्ञ देत आहेत. तज्ज्ञ म्हणतात की, ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे, त्यांनाच कोरोनाची लागण होत आहे. म्हणून कोरोनाच्या काळात तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असली पाहिजे. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असेलतर आपण कोणत्याही आजारावर मात देखील करू शकतो. (These are the symptoms of a weakened immune system)
रोग प्रतिकारशक्ती कमकुवत आहे की नाही हे कसे जाणून घ्यावे
1. जास्त आजारी पडणे – हवामान बदलताच, आपल्याला सर्दी, ताप आणि खोकलाचा त्रास होतो आणि जर तुम्ही लवकर आजारी पडत असाल तर तुमची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत आहे. रोगप्रतिकारक शक्ती जीवाणू आणि विषाणूंविरूद्ध लढायला मदत करते. जर आपल्याला फ्लू, तोंडात फोड इत्यादी समस्या असतील तर विशेष काळजी घ्या आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.
2. नेहमी थकवा जाणवतो – सकाळी उठल्यावरही शरीरात कमजोरी आणि थकवा, रात्री पुरेशी झोप होत नाही. यामागे बरीच कारणे असू शकतात. जर सात ते आठ तास झोप होऊन सुध्दा जर तुम्हाला थकवा येत असेल तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असल्याचे हे एक लक्षण आहे.
3. पोटाची समस्या – नेहमीच पोटाची समस्या असणे, पचनक्रियेचा त्रास असणे. ही लक्षणे देखील कमकुवत रोगप्रतिकारक शक्तीची आहेत. मात्र, ही सर्व लक्षणे बऱ्याच वेळा बाहेरचे अन्न खाल्ल्याने देखील होतात.
अशाप्रकारे रोगप्रतिकारक शक्ती वाढवा
1. आपल्या आहाराकडे विशेष लक्ष द्या. प्रथिने आणि फायबरयुक्त पदार्थ खा. या व्यतिरिक्त आहारात लाल शिमला मिरची, लसूण, ब्रोकोली, स्ट्रॉबेरी इ. खा.
2. उन्हाळ्यात दही नक्कीच खा. त्यात व्हिटॅमिन डी असते जे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतात.
3. याशिवाय आहारात व्हिटॅमिन सीची फळे खा. पुरेसे पाणी प्या.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Healthy Food For Typhoid | टायफॉइड तापात ‘या’ 5 गोष्टींचे सेवन ठरेल लाभदायी
चहा-कॉफी की बियर-वाईन, काय पिता तुम्ही… त्याचे फायदे-तोटे तुम्हाला माहिती आहे का?
beauty tips | फक्त ‘या’ 6 गोष्टी करा आणि मिळवा तजेलदार चेहराhttps://t.co/6Sm47ZBB8x#beauty #beautytips #tips
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 7, 2020
(These are the symptoms of a weakened immune system)