calcium deficiency: कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होतात हे आजार, अशी करा त्यावर मात

| Updated on: Dec 20, 2023 | 8:27 PM

calcium deficiency : कॅल्शियमची कमतरता निर्माण झाली की अनेक समस्या निर्माण होतात. कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी तुम्ही आहारात बदल करायला हवा. आहारात काही गोष्टींचा समावेश करुन तुम्ही त्यावर मात करु शकतात. जाणून घ्या कॅल्शियमच्या कमतरतेमुळे कोणते आजार होऊ शकतात. त्यावर मात कशी करावी.

calcium deficiency: कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होतात हे आजार, अशी करा त्यावर मात
calcium
Follow us on

calcium deficiency diseases : आपलं शरीर निरोगी ठेवायचे असेल तर आपल्याला सर्व जीवनसत्त्वे, प्रथिने आणि खनिजे कसे मिळतील याकडे लक्ष दिले पाहिजे. कोणत्याही पोषक तत्वाच्या कमतरतेमुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. त्यातीलच एक महत्त्वाचे पोषक घटक म्हणजे कॅल्शियम. कॅल्शियम आपली हाडे आणि सांधे मजबूत आणि निरोगी ठेवण्याचे काम करते. शरीरात कॅल्शियम जर कमी झाले तर हाडे कमकुवत होऊ लागतात. त्यामुळे फॅक्चर होण्याचा धोका वाढतो. पण त्यासोबतच इतर आजारांचा देखील सामना करावा लागू शकतो. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या समस्या.

कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होणारे आजार

रिकेट्स : कॅल्शियमच्या कमतरतेमुळे, तुम्ही रिकेट्सचे शिकार होऊ शकता. या आजारात तुमची हाडे खूप मऊ आणि लवचिक होतात. त्यामुळे हात पाय कोठूनही सहज वाकतात. जर व्हिटॅमिन डी किंवा कॅल्शियमच्या कमतरतेमुळे रिकेट्स होत असेल तर ते योग्य आहाराद्वारे पुरक करून बरे केले जाऊ शकते.

ऑस्टियोपोरोसिस: ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडे कमकुवत होणे. जर तुम्ही तुमच्या आहारात कॅल्शियम कमी प्रमाणात घेत असाल तर तुमची हाडे झपाट्याने कमकुवत होऊ लागतात. यामुळे पाठदुखी, कंबरदुखी, मानदुखी अशी समस्या निर्माण होते. ज्याकडे दुर्लक्ष केल्यास पुढे हाडे तुटायला लागतात आणि वेदना कायम राहतात.

हे सुद्धा वाचा

क्रॅम्प्स: जर तुम्हाला वारंवार क्रॅम्प्सचा अनुभव येत असेल तर तुमच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता आहे. हे त्याचे पहिले लक्षण असू शकते. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे तुमचे स्नायू मऊ होतात. ज्यानंतर क्रॅम्प्सचा धोका वाढतो.

नैराश्य आणि चिंता : व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमच्या कमतरतेमुळे लोकं नैराश्याने ग्रस्त आहेत.

आहारात कोणत्या पदार्थांचा करावा समावेश

कॅल्शियमच्या कमतरतेवर मात करण्यासाठी जर्दाळू, किवी, दही, संत्री, दूध, चीज यासारख्या कॅल्शियमयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा.