शरीरासाठी पोटॅशियम (Potassium) हे एक अतिशय महत्त्वाचे खनिज मानले जाते. ते मज्जातंतूचे कार्य योग्य पध्दतीने करण्यासाठी महत्वपूर्ण असते. शिवाय यातून स्नायूंचे आकुंचन आणि शरीरातील द्रवपदार्थाचे संतुलन नियंत्रित करण्यास मदत होते. हृदयाचे ठोके पडण्यास पोटॅशियमचे सर्वात महत्त्वाचे कार्य आहे. जेव्हा शरीरात पोटॅशियमची तीव्र कमतरता असते तेव्हा त्याला वैद्यकीय परिभाषेत ‘हायपोक्लेमिया’ (Hypokalemia) असे म्हणतात. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या शरीरातील पोटॅशियमची पातळी प्रतिलिटर 3.6 मिलीमोल्सच्या (millimoles) खाली येते तेव्हा हायपोक्लेमियाची समस्या निर्माण होत असते. अनेक वेळा आहारात पोटॅशियमचे प्रमाण पुरेसे नसल्यामुळे शरीरात पोटॅशियमची कमतरता निर्माण होते किंवा एखाद्या व्यक्तीला खूप दिवसांपासून जुलाब किंवा उलट्यांचा त्रास होत असेल तर त्यामुळेही शरीराचे नुकसान होते. शरीरात शरीरात पोटॅशियमच्या कमतरतेमुळे पुढील अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो.
एका संशोधनानुसार जर शरीरात पोटॅशियमची कमतरता असेल तर त्यामुळे व्यक्ती चिंताग्रस्त होउ शकतो. त्यामुळे साहजिक त्याच्या झोपेवर परिणाम होतो आणि रात्री झोप लागत नसल्याच्या तक्रारी येत असतात. झोप न येण्याच्या समस्येला निद्रानाश म्हटले जाते.
जर शरीरात पोटॅशियमची पातळी कमी असेल तर उच्च रक्तदाब वाढू शकतो, विशेषत: जे लोक मीठाचा जास्त वापर करतात, अशांना ही समस्या निर्माण होत असते. पोटॅशियम रक्तवाहिन्यांना आराम देते, ज्यामुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते. पोटॅशियम शरीरातील सोडियमची पातळी राखण्याचे काम करते.
जर हृदयाचे ठोके कमी जास्त होत असतील, तर हे हायपोक्लेमिया किंवा पोटॅशियमच्या कमतरतेचे लक्षण देखील असू शकते. पोटॅशियम हृदयाच्या स्नायूंच्या आकुंचनाचे नियमन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे शरीरात पोटॅशियमची पातळी कमी झाल्यास हृदयाची लय बिघडू शकते. आणि ‘वेंट्रिक्युलर फायब्रिलेशन’सारखे जीवघेणे आजार होऊ शकतात.
पोटॅशियम हे शरीराच्या सर्व पेशी आणि टीशूज म्हणजेच ऊतींमध्ये आढळणारे सर्वात महत्वाचे पोषक तत्व आहे. जेव्हा पोटॅशियमची पातळी कमी होते तेव्हा त्याचा शरीराच्या अनेक कार्यांवर वाईट परिणाम होतो, ज्यामुळे व्यक्तीची उर्जादेखील कमी होते आणि व्यक्ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खूप थकल्यासारखा दिसतो.
पोटॅशियमच्या कमतरतेमुळे आतड्यात असलेल्या स्नायूंवरही त्याचा परिणाम होतो, त्यामुळे शरीरातून अन्न आणि टाकाऊ पदार्थ बाहेर पडण्याची प्रक्रियाही मंदावते. पचनाची ही प्रक्रिया आतड्यात मंदावल्यास बद्धकोष्ठता आणि सूज येणे यासारख्या समस्या समस्या निर्माण होतात.
1. बटाटा
2. डाळिंब
3. एवोकाडो
4. रताळे
5. पालक
6. व्हाईट बीन्स
7. नारळ पाणी
8. बीट
9. सोयाबीन
10. टोमॅटो
इतर बातम्या-