तुमच्या ‘या’ चुका तर ठरत नाहीयत ना केस गळतीचे कारण?

| Updated on: Apr 05, 2021 | 3:47 PM

अनेक महिला केस गळतीच्या समस्येमुळे त्रस्त आहेत. सुरुवातीला जेव्हा केस गळती होते.

तुमच्या या चुका तर ठरत नाहीयत ना केस गळतीचे कारण?
केळीमध्ये भरपूर पोषक घटक असतात. जे आपल्या केसांना आश्चर्यकारक फायदे देतात. मधात अँटी-ऑक्सीडंट्स भरपूर असतात. जे केस चमकदार करतात. उन्हाळ्यात केळी आणि मधाचा पॅक तयार करा आणि केसांना लावा. यामुळे केस कोरडी होत नाहीत.
Follow us on

मुंबई : अनेक महिला केस गळतीच्या समस्येमुळे त्रस्त आहेत. सुरुवातीला जेव्हा केस गळती होते. तेंव्हा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र, केस गळतीची समस्या वाढते आणि हळूहळू टक्कल पडायला लागते. तेंव्हा आपल्याला जाग येतो आणि आपण उपचार घेण्यास सुरूवात करतो. परंतू आपल्या काही चुकीच्या सवयीमुळे देखील केस गळती होण्याचे कारण असते. बऱ्याचजणांना केसांची योग्य निगा कशी राखायची हे देखील माहिती नसते. चला तर बघूयात नेमकी केसांची काळजी कसा पध्दतीने घ्यायची (These mistakes can casue Hair Fall Problem)

घाई घाईत आपण ड्रायरची हिट वापरून केस कोरडे करता, ज्यामुळे केस कमकुवत होतात. ओल्या केसांना कोरड्या टॉवेलने किंवा मोकळ्या हवेत वाळवा. ओले केस कधीच कंगवा वापरून विंचरू नका. केस चांगले कोरडे झाल्यावर त्यावर तेल लावा आणि मसाज करा. केसांना तेल लावल्यानंतर आपण ते कोमट पाण्याने स्वच्छ धुतले पाहिजे. हे लक्षात ठेवावे की जास्त गरम पाणी वापरल्याने आपल्या केसांमध्ये कोरडेपणा उद्भवू शकतो. नेहमी कोमट पाण्याने कुरळे केस धुवावे

आपल्या केसांना योग्य पोषण मिळण्यासाठी आणि ते चमकदार होण्यासाठी, केस धुतल्यानंतर कंडीशनिंग करणे महत्वाचे आहे. तसे, बाजारात आधीपासूनच बऱ्याच प्रकारचे कंडिशनर्स आहेत, जे आपल्या केसांना ठराविक काळासाठी चमकदार बनवू शकतात. परंतु, या कंडिशनर्समध्ये रसायने खूप जास्त प्रमाणात असता. आपल्या केसांच्या आरोग्यासाठी ती खूप घातक सिद्ध होतात. ही रसायने आपल्या केसांना रुक्ष आणि निर्जीव बनवतात. म्हणून केसांना कंडिशनर्स जास्त प्रमाणात लावणे धोकादायक आहे.

कोरफड आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध आहे. हे केवळ आपल्या त्वचेची काळजी घेत नाही, तर आपल्या केसांसाठीही फायदेशीर ठरतात. यामुळे आपले केस चमकदार होतात. कोरफडयुक्त हेअर कंडिशनर बनवण्यासाठी, प्रथम कोरफडच्या पानांतून गर काढा. आता एक चमचे लिंबाचा रस, 4 चमचे कोरफड जेलमध्ये घाला. आता हे मिश्रण आपल्या केसांवर लावा आणि सुमारे 10 मिनिटे आपल्या केसांवर तसेच राहू द्या. 10 मिनिटांनंतर कोमट पाण्याने आपले केस स्वच्छ करा.

संबंधित बातम्या : 

तुम्हीसुद्धा सकाळी नाश्त्यामध्ये ‘पोहे’ खाता का? मग जाणून घ्या आरोग्यावर काय होतो परिणाम!

(These mistakes can casue Hair Fall Problem)