Radish side effcet : मुळा जेवणासोबत अनेकांना खायला आवडतो. मुळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, फायबर आणि पोटॅशियम आढळते. मुळा खाल्ल्यामुळे पचन सुधारते, बद्धकोष्ठता दूर करणे, वजन कमी होते आणि प्रतिकारशक्ती वाढते. मुळा खाण्याचे अनेक फायदे आहेत. मात्र, मुळा कोणी खाऊ नये. मुळा कोणासाठी हानीकारक ठरु शकतो. चला जाणून घेऊया.
कमी रक्तदाबाची समस्या आहे त्या व्यक्तींनी मुळ्याचे सेवन करू नये. मुळ्यात मूत्रवर्धक गुणधर्म असतात, जे शरीरातील पाणी काढून टाकतात. यामुळे कमी रक्तदाबाची समस्या आणखी वाढू शकते.
हायपोग्लायसेमिया (कमी रक्तातील साखरेची) समस्या आहे अशा व्यक्तीेनी देखील मर्यादित प्रमाणात मुळ्याचे सेवन करावे. मुळ्यात इंसुलिन वाढवणारे गुणधर्म असतात, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होते.
ज्या व्यक्तींना पित्तशयात खडे होण्याची समस्या आहे. अशा व्यक्तींनी देखील मुळा खाऊ नये. मुळा खाल्याने पित्त वाढते. ज्यामुळे पित्त खड्यांची समस्या वाढू शकते.
गर्भवती महिलांनी देखील मुळ्याचे सेवन करू नये. मुळ्यात काही गुणधर्म असे असतात ज्यामुळे गर्भपात होऊ शकतो.
स्तनपान देणाऱ्या महिलांनी देखील मुळ्याचे सेवन कमी करावे. मुळ्यात असलेल्या काही गुणधर्मामुळे ते आईच्या दुधात जाऊ शकतात आणि बाळाला हानी पोहोचवू शकतात.