या लोकांनी चुकूनही करू नये पपईचे सेवन, फायद्याऐवजी होईल नुकसान

| Updated on: Nov 30, 2024 | 4:00 PM

पपई खाल्ल्याने आपल्या शरीराला अनेक पोषक घटक मिळतात. आरोग्यासाठी पपई चांगली मानल्या जाते. पण आरोग्याच्या काही समस्या असल्यावर पपईचे सेवन टाळले पाहिजे.

या लोकांनी चुकूनही करू नये पपईचे सेवन, फायद्याऐवजी होईल नुकसान
Follow us on

गोड चव आणि पोषक तत्वांमुळे अनेकांना पपई आवडते. त्यात भरपूर प्रमाणात जीवनसत्वे ए, सी आणि ई असतात. जे त्वचा आणि डोळ्यांसाठी चांगले असतात. याशिवाय यामध्ये फायबर देखील असते जे पचनास मदत करते पण पपई प्रत्येकासाठी फायदेशीर नाही. काही लोकांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पपईचे सेवन करू नये जाणून घेऊया कोणत्या लोकांनी पपई खाणे टाळावे आणि का?

या लोकांनी टाळावे पपईचे सेवन

किडनी स्टोन
किडनी स्टोनचा त्रास असणाऱ्यांनी पपई खाणे टाळावे. पपईमध्ये ऑक्सलेट नावाचा घटक असतो जो किडनी स्टोन तयार करण्यास मदत करतो. जर तुम्हाला आधीच किडनी स्टोनचा त्रास होत असेल तर पपई खाल्ल्याने तुमची समस्या वाढू शकते.

गरोदर स्त्रियांनी
गरोदरपणात महिलांनी आपल्या खाण्याच्या सवयींची विशेष काळजी घ्यावी. पपईमध्ये लेटेक्स नावाचा पदार्थ असतो जो गर्भाशयाला संकुचित करू शकतो. यामुळे अकाली प्रसुती किंवा गर्भपात होण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे गरोदर महिलांनी
पपई खाणे टाळावे.

हे सुद्धा वाचा

त्वचेची समस्या
काही लोकांना पपईची एलर्जी असू शकते तुम्हाला खाज सुटणे, लालसरपणा किंवा सूज येणे यासारख्या त्वचेच्या समस्या असल्यास पपई खाण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. पपई खाल्ल्याने तुमच्या त्वचेच्या समस्या वाढू शकतात.

हृदयरोग
हृदयरोग असलेल्या रुग्णांनी पपई खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. पपई मध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते जे हृदयरोगासाठी हानिकारक ठरू शकते.

मधुमेह
मधुमेहाच्या रुग्णांनी पपई खाताना काळजी घ्यावी. पपईमध्ये नैसर्गिक साखर असते. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी पपई खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

औषध
तुम्हाला कुठलाही प्रकारची औषधे सुरू असतील तर पपई खाणे टाळा. पपई खाल्ल्यानंतर औषध घेतल्याने त्याची रिएक्शन होण्याची शक्यता असते.

पपई किती आणि कधी खावी?
जर तुम्हाला आरोग्य संबंधित काही समस्या नसेल तर तुम्ही पपई मध्यम प्रमाणात खाऊ शकता पपई नाश्ता किंवा दुपारचे जेवण म्हणून खाऊ शकता. तुम्ही पपईचा रस देखील पिऊ शकता.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)