मुंबई : चांगली झोप (Sleeping better) प्रत्येकासाठी खूप महत्त्वाची आहे. झोप चांगली झालेली असल्यास दुसऱ्या दिवशी तुम्हाला उत्साही आणि उर्जावान वाटत असते. या शिवाय झोप चांगली झाल्याने मन तणावमुक्त होते. रात्री जास्त वेळ जागल्यास सकाळी उशीरा जाग येते, पुरेशी व योग्य झोप झालेली नसल्यास आपल्याला चिडचिड आणि थकवा जाणवतो. यामुळे पुढील संपूर्ण दिवस वाईट जाण्याची शक्यताही वाढते. यासाठी रात्री वेळेवर झोपणे आवश्यक आहे. 7 ते 8 तासांची चांगली झोप खूप महत्त्वाची आहे. पण जर तुम्हाला चांगली झोप येत नसेल तर तुम्ही त्यासाठी काही योगासनेदेखील करू शकता. ही योगासने (Yogasanas) तुम्हाला तणावमुक्त करण्यात आणि चांगली झोप घेण्यास मदत करू शकतात. कधीकधी अपचन, बद्धकोष्ठता आदी समस्यांचाही झोपेवर वाईट परिणाम होतो. शांत झोप लागण्यासाठी कोणती योगासने परिणामकारक (Effective) ठरतील, याची माहिती जाणून घेणार आहोत.
आपले गुडघे वाकवा आणि आपले शरीर सरळ ठेवा. सरळ स्थितीत आपले हात आपल्या मांडीवर ठेवा. हळूहळू श्वास घ्या आणि बाहेर सोडा. वज्रासन आपल्याला तणाव आणि चिंता कमी करण्यास मदत करू शकते. त्यामुळेच आपल्याला चांगली झोप येण्यास मदत होते.
हे एक प्राचीन तंत्र आहे. हे तणाव कमी करण्यासाठी आणि चांगली झोप लागण्यासाठी उत्तम काम करते. यासाठी शवासनामध्ये आराम करावा. दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू श्वास सोडा. यामुळे तणाव कमी होतो. एकाग्रता सुधारते.
बालासन करण्यासाठी आपल्या गुडघ्यावर खाली बसावे. आपले शरीर खाली आणि पुढे खेचताना बट आपल्या टाचांकडे ठेवा. हात पुढे करा. चटईवर आपले कपाळ ठेवा. या दरम्यान तुम्हाला तुमचे खांदे, नितंब, पाठीचा कणा आणि हातांमध्ये ताण जाणवेल.
या आसनासाठी पोटावर झोपावे लागेल. आपल्या डोक्याखाली आपले हात क्रॉस करा. मनगटावर कपाळ ठेवा आणि घोटे बाहेरच्या दिशेने वळवा. डोळे बंद करा. याच आसनात काही वेळ विश्रांती घ्या.
पहिल्यांदा आपले डोळे बंद ठेवा. आपले दोन्ही कान अंगठ्याने बंद करा. सामान्य श्वासोच्छवासाने चेहऱ्यावर चार बोटांचे संतुलन ठेवा. तोंड बंद ठेवा आणि तोंडातल्या तोंडात काहीतरी गुणगुणा. जेव्हा तुम्ही हे कराल, तेव्हा तुम्हाला चेहरा आणि डोक्याच्या भागात कंपने जाणवतील. हे सुमारे 10 मिनिटे करा. हे मानसिक थकवा दूर करण्यास, मन शांत करण्यास आणि झोप लागण्यास मदत करेल.
व्यायामामुळे शारीरिक नव्हे तर मानसिक आरोग्यावरही होतील हे सकारात्मक बदल
Sugar Free Food | शुगर फ्री पदार्थांमागे धावणे सोडा, एक-दोन नव्हे, तब्बल 92 साईड इफेक्ट्स
Health care : शरीर तंदुरुस्त कसे ठेवायचे? वाचा आयुर्वेदाचा सल्ला आणि निरोगी राहा!