मुंबई : ‘बीट’ हे एक कंदमूळ आणि गोडसर चवीची भाजी आहे. आपल्या पैकी अनेकांना बीटाची चव आवडत नाही. परंतु, बीट आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्याच्या गुणधर्मांमुळे, त्याला ‘सुपरफूड’ देखील म्हटले जाते. बीटाचा रस देखील शरीराला अनेक प्रकारचे फायदेशीर ठरतो. वजन नियंत्रित करण्याबरोबरच रक्तदाब कमी करण्यातही बीट फायदेशीर ठरते. (This beetroot halwa recipi you shoul try once)
बऱ्याचदा सलाडमध्ये आपण बीटाचा वापर करून ते खातो. आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन वाढण्यासाठी सर्वात महत्त्वाचा जर कोणता पदार्थ असेल तर तो म्हणजे बीट आहे. मात्र, बऱ्याच जणांना याची चव आवडत नाही त्यामुळे अनके लोक बीट खाण्याचे शक्यतो टाळतात. तुम्हीही बीट खाण्याचे टाळत असालतर ही खास बातमी तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला बीटपासून हलवा कसा तयार करायचा हे सांगणार आहोत.
-साहित्य
बीट
तूप
बदाम
काजू
साखर
सुरूवातीला बीटाचे साल काढून घ्या त्यानंतर बीट खिसून घ्या पॅनमध्ये खिसलेले बीट टाका 20 ते 25 मिनिट बीटला मंद गॅसवर ठेवा. त्यानंतर तूप आणि साखर घाला. बदाम आणि काजू बारीक करून घ्याला. हा तयार होईल आपला चवदार बीटचा हलवा. हा आपल्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. बीटाच्या रसात पोटॅशियमचे प्रमाण अधिक असते. नसा आणि स्नायूंना योग्यरित्या कार्य करण्यास मदत करतो.
बीटचा रस योग्य प्रमाणात पिण्यामुळे शरीरात पोटॅशियमची पातळी चांगली राहते. शरीरात पोटॅशियमचे प्रमाण कमी असल्यामुळे थकवा, अशक्तपणा आणि स्नायू दुखीचा त्रास होतो. पोटॅशियम कमी झाल्यास हृदयरोगाचा धोका देखील वाढतो. बीटाच्या रसात लोह, मॅग्नेशियम, मॅंगनीज, सोडियम, जस्त, तांबे आणि सेलेनियम असते. ही सर्व खनिजे शरीरात रोग प्रतिकारशक्ती वाढवतात आणि दात व हाडे निरोगी ठेवतात.
टीप : सदर लेख संशोधनावर आधारित असून, कुठलाही उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.
संबंधित बातम्या :
Food | थंडीच्या दिवसांत आहारात ‘या’ गोष्टी समविष्ट करा आणि आजारांपासून दूर राहा!https://t.co/h7Jb5fvOas#food #health
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 28, 2020
(This beetroot halwa recipi you shoul try once)