नवी दिल्ली – आपले केस सुंदर रहावेत म्हणून बऱ्याचदा महिला अनेक प्रकारचे शांपू (shampoo) आणि कंडीशनर यांचा वापर करतात. मात्र महागडे शांपू आणि कंडीशनर वापरल्याने तुमचे केस सुंदर (hair care) दिसतील पण ते सुरक्षित राहतीलच याची काही खात्री नाही. पण तुम्ही घरच्या घरी नैसर्गिक पद्धतीने शांपू (homemade natural shampoo) तयार करू शकता, ज्याचा वापर केल्याने केसांना पोषण तर मिळेलच पण ते मजबूतही होतील. तुम्ही घरी हर्बल शांपू यार करून केसांना मजबूत बनवू शकाल तसेच कोंडा (dandruff) आणि केसगळती या समस्यांपासून मुक्ती मिळवू शकता.
असा बनवा घरी हर्बल शांपू
साहित्य- शिकेकाई – 2 चमचे , रीठा पावडर – 2 चमचे, कडूनिंबाची बावडर – 1 चमचा, आवळा पावडर – 1 चमचा
कृती – सर्वप्रथम एका कढईत एक ग्लास पाणी घेऊन ते गरम करावे. पाणी गरम झाल्यावर त्यामध्ये शिकेकाई, रीठा पावडर, कडूनिंबाची पावडर व आवळा पावडर घालून नीट एकत्र करावे. त्त्यानंतर ते मिश्रण चांगले उकळू द्यावे. नंतर गॅस बंद करून हे मिश्रण पूर्ण गार होऊ द्यावे. थोड्यावेळाने हे मिश्रणयुक्त पाणी नीट गाळून ते पाणी एका बाटलीत भरून ठेवावे. या घरी बनवलेल्या बर्बल शांपूचा वापर तुम्ही केसांसाठी करू शकता.
असा करा वापर
केसांसाठी हा शांपू वापरण्याआधी तुमचे केस ओले करा. मग हे शांपूचे मिश्रण आपल्या स्काल्पवर लावावे. हलक्या हातांनी केसांना मसाज करा. थोड्या वेळानंतर केस साध्या पाण्याने स्वच्छधुवावेत. यामुळे तुमचे केस चमकदार दिसतील.
मिळतील अनेक फायदे
आवळा, रीठा, शिकेकाई आणि कडुनिंब यांच्यामध्ये अँटीसेप्टिक तसेच अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. हे गुणधर्म आपल्या स्काल्पची पीएच पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात. याशिवाय या शांपूचा वापर केल्याने तुमचे केस सुंदर, चमकदार आणि मजबूत बनतात. तसेच केस तुटणे, गळणे,दुभंगणे आणि कोंडा होणे, अशा केसांच्या समस्याही दूर होतील. केसांमध्ये कोरडेपणा आणि कोंडा असेल तर तुम्ही या शांपूचा वापर करू शकता. यामुळे केसांना पोषण मिळण्यास मदत होते.